ऊर्जा अर्थव्यवस्था
ऊर्जेचे उत्पादन आणि विक्री करणारे उद्योग
ऊर्जा अर्थव्यवस्था ही अशी संकल्पना आहे ज्यात सर्व लोकं आणि संस्था यांच्या प्रत्येक कार्याचे व निर्णयाचे ध्येय हेच असते की घरे, कारखाने यांसाठी ऊर्जा पुरवठा करणे व ऊर्जेची निर्मिती तसेच खरेदी-विक्री यां गोष्टींची व्यवस्था पाहणे आणि पारंपारिक, पुनरुत्पादीत ऊर्जेच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे. यामधे नैसर्गिक वायू, द्रवरूप इंधने, विद्युत शक्ती, कोळसा, कोक व लाकूड या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सर्व नूतनीकरणक्षम ऊर्जांचा जसे सौर ऊर्जा, जल-विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा समावेश होतो.