उषाकिरण

(उषा मराठे-खेर या पानावरून पुनर्निर्देशित)
Usha Kiran (es); Usha Kiran (ast); Уша Киран (ru); ऊषा किरण (mai); Usha Kiran (en-gb); اوشا کیران (fa); Usha Kiran (da); उषा किरण (ne); اوشا کرن (ur); Usha Kiran (tet); Usha Kiran (sv); Usha Kiran (ace); ऊषा किरण (hi); ఉషా కిరణ్ (నటి) (te); Usha Kiran (fi); উষা কিৰণ (as); Usha Kiran (en-ca); Usha Kiran (map-bms); Usha Kiran (it); ঊষা কিরণ (bn); Usha Kiran (fr); Usha Kiran (jv); उषाकिरण (mr); ଉଷା କିରଣ (or); Usha Kiran (nl); Usha Kiran (bjn); Usha Kiran (bug); Usha Kiran (sl); Usha Kiran (ca); Usha Kiran (pt-br); Usha Kiran (pt); Usha Kiran (id); Usha Kiran (nn); Usha Kiran (nb); Usha Kiran (su); Usha Kiran (min); Usha Kiran (gor); Usha Kiran (de); Usha Kiran (ga); Usha Kiran (en); أوشا كيران (ar); اوشا كيران (arz); ਊਸ਼ਾ ਕਿਰਨ (pa) attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); indisk skuespiller (nb); actriz india (1929–2000) (ast); actriu índia (ca); Indian actress (1929-2000) (en); actores a aned yn 1929 (cy); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); Indian actress (en-gb); بازیگر هندی (fa); actriz india (gl); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); ہندوستانی اداکارہ (ur); ممثلة هندية (ar); שחקנית הודית (he); indisk skådespelare (sv); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (1929-2000) (nl); індійська акторка (uk); pemeran asal India (id); भारतीय चलचित्र अभिनेत्री (ne); ਭਾਰਤੀ ਅਭਿਨੇਤਰੀ (pa); Indian actress (1929-2000) (en); Indian actress (en-ca); ban-aisteoir Indiach (ga); actriz india (es)

उषाकिरण (जन्म : वसई २२ एप्रिल १९२९; - मुंबई ९ जानेवारी २०००) या मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या एक श्रेष्ठ अभिनेत्री होता. उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. घरासाठी आणखी उत्पन्नाचे एक साधन हा विचारही त्यामागे होता.

उषाकिरण 
Indian actress (1929-2000)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखएप्रिल २२, इ.स. १९२९
वसई-विरार
मृत्यू तारीखमार्च ९, इ.स. २०००
नाशिक
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९४९
नागरिकत्व
व्यवसाय
अपत्य
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली.

नृत्य शिकण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविख्यात नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली. बंगाली, गुजराती, हिंदी , तामीळ आणि इंग्रजी या भाषाही त्यांनी आत्मसात केल्या.

पुण्यात आल्यावर उषा यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर त्यांचा मराठी सिनेसृष्टीत जम बसू लागला. मंगल पिक्चर्सचा ’जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांना मागण्या येऊ लागल्या. अमराठी सिनेमांचाही यात समावेश होता. त्यांनी अमेय चक्रवर्तीसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबतही काम केले. मात्र १९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.

उषाकिरण यांनी ’जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ’पुनवेची रात’मध्ये तमासगिरीण तर ’बाळा जो जो रे’मध्ये ’सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच्या ’शिकलेली बायको’ आणि ’कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनयसामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ’पतित’मध्ये देव आनंद, ’दाग’मध्ये दिलीपकुमार, ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. या सिनेमांमुळे हिंदी सिनेसृष्टीतही त्यांची लोकप्रियता वाढली.

डॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मोजकेच सिनेमे केले. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला.

उषाकिरण यांचे कॅन्सरने ९ जानेवारी २००० रोजी निधन झाले.

आत्मचरित्र

संपादन
  • उषाकिरण यांनी ’उषःकाल’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

उषाकिरण यांचे मराठी चित्रपट

संपादन
  • कुबेर-१९४७
  • सीतास्वयंवर-१९४८
  • मायाबाजार-१९४९
  • चाळीतील शेजारी-१९५०
  • क्रांतीवीर वासुदेव बळवंत-१९५०
  • श्रीकृष्णदर्शन-१९५०
  • बाळा जो जो रे-१९५१
  • जशास तसे-१९५१
  • मर्द मराठा-१९५१
  • माया मच्छिंद्र-१९५१
  • विठ्ठल रखुमाई-१९५१
  • बेल भंडारा-१९५२
  • दूधभात-१९५२
  • स्त्री जन्मा ही तुझी कहाणी-१९५२
  • कांचनगंगा-१९५४
  • पोस्टातील मुलगी-१९५४
  • कलगीतुरा-१९५५
  • पुनवेची रात-१९५५
  • प्रीतिसंगम-१९५७
  • शिकलेली बायको-१९५९
  • चाळ माझ्या पायांत-१९६०
  • सख्या सावरा मला-१९६०
  • एक धागा सुखाचा-१९६१
  • माणसाला पंख असतात-१९६१
  • गरिबाघरची लेक-१९६२
  • सुनबाई-१९६२
  • सप्तपदी-१९६४
  • फटाकडी-१९७९