उर्फी जावेद
उर्फी जावेद ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. तिने 'बडे भैय्या की दुल्हनिया' मध्ये 'अवनी', 'मेरी दुर्गा' मध्ये 'आरती' आणि 'बेपनाह' मध्ये 'बेला' तसेच 'पंच बीट सीझन-२' मध्ये 'मीरा' नावाने विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. 'पंच बीट सीझन-२' ही एक एएलटी बालाजी वर प्रवाहित होणारी मालिका आहे.[३]
उर्फी जावेद | |
---|---|
उर्फी जावेद | |
जन्म |
[१] लखनौ, उत्तर प्रदेश[२] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१६ ते आजतागायत |
भाषा | हिंदी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | बेपनाह |
धर्म | मुस्लिम |
वैयक्तिक आयुष्य
संपादनउर्फी जावेदचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी लखनौ, उत्तर प्रदेश येथे झाला. तिने लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि तिने अॅमिटी युनिव्हर्सिटी लखनौ मधून जनसंवादामध्ये (मास कम्युनिकेशन मध्ये) पदवी पूर्ण केलेली आहे.[२][४]
कारकीर्द
संपादनइ.स. २०१६ मध्ये, जावेद ने 'सोनी टीव्ही' वरील हिंदी मालिका बडे भैय्या की दुल्हनिया मध्ये अवनी पंत पात्राची भूमिकेत काम करून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.[५] त्यानंतर इ.स. २०१६ मध्ये तिने स्टार प्लसच्या 'चंद्र नंदिनी' मध्ये राजकुमारी छायाची भूमिका साकारली. मग, २०१७ साली स्टार प्लस वर 'मेरी दुर्गा' मध्ये आरतीच्या भूमिकेत दिसली.[६] इ.स. २०१८ मध्ये, ती सब टीव्हीवर वरिल 'सात फेरो की हेराफेरी' मध्ये कामिनी जोशी, 'बेपनाह' मध्ये बेला कपूर, 'जिजी माँ' मध्ये श्रावणी आणि पियाली, तर 'डायन' मध्ये नंदिनी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारताना दिसून आली.[७][८]
इ.स. २०२० मध्ये ती 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत शिवानी भाटिया म्हणून, 'कसोटी जिंदगी के' मध्ये तनिषा चक्रवर्ती म्हणून, आणि 'ऐ मेरे हमसफर' मध्ये पायल शर्मा म्हणून काम करताना दिसून आली.[९][१०]
विवादास्पद मुद्दे
संपादन- इ.स. २०२१ मधील 'बिग बॉस ओटीटी' या वास्तव प्रदर्शनी (रिअॅलिटी शो) मध्ये तिचा समावेश झाला होता. परंतु ८व्या दिवशी ती या खेळातून बाहेर काढल्या गेली. यामुळे संतापून जाऊन तिने यावर तिखट प्रतिक्रिया देखील दिली.[३]
- जावेद ही खुल्या विचाराची असल्यामुळे तिच्या पेहरावावरून तिच्यावर बऱ्याच वेळा टीका झाली.[११] याच वेळी तिने आपल्या टीकेला धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला.[१२]
अभिनय सूची
संपादनदूरचित्रवाहिनी
संपादनवर्ष | दाखवा | भूमिका | नोट्स |
---|---|---|---|
२०१६ | बडे भैय्या की दुल्हनिया | अवनी पंत | |
२०१६-१७ | चंद्र नंदिनी | राजकुमारी छाया | |
२०१७ | मेरी दुर्गा | आरती | |
२०१८ | साथ फेरो की हेरा फेरी | कामिनी जोशी | |
बेपन्नाह | बेला कपूर | ||
जिजी मा | श्रावणी पुरोहित/ पियाली सहगल | ||
२०१८-१९ | डायन | नंदिनी | |
२०२० | ये रिश्ता क्या कहलाता है | शिवानी भाटिया | |
कसौटी जिंदगी के | तनिषा चक्रवर्ती | ||
२०२० | ऐ मेरे हमसफर | पायल शर्मा | |
२०२१ | बिग बॉस ओटीटी | स्पर्धक | बहिष्कृत, दिवस-८/४२ |
संदर्भ
संपादन- ^ "Urfi Javed". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-29.
- ^ a b "Urfi Javed feels fighting is inevitable on Bigg Boss. Interview". 9 August 2021.
- ^ a b "Urfi Javed After Being Evicted From 'Bigg Boss OTT': 'I Will Kill Everyone'". एबीपी न्यूझ (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Urfi Javed Biography". Theancestory. May 29, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Urfi Javed sets hearts racing with these bold pictures". Times of India (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Meri Durga actors Urfi Javed and Vicky Ahuja join &TV's Daayan". Tellychakkar (इंग्रजी भाषेत). 2023-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-29 रोजी पाहिले.
- ^ "This actress is all set to enter Jennifer Winget and Harshad Chopda's Bepannaah". India Today (इंग्रजी भाषेत).
- ^ "Charu Asopa replaces Urfi Javed in 'Jiji Maa'". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ "Yeh Rishta Kya Kehlata Hai: Urfi Javed to enter as Trisha's lawyer". ABP Live (इंग्रजी भाषेत).
- ^ "Urfi Javed to enter Kasautii Zindagii Kay post leap". ABP Live (इंग्रजी भाषेत).
- ^ "ब्रा के बाद अब बैकलेस कपड़ों में उर्फी जावेद ने दिखाई पीठ, दाग देख एक शख्स ने किया ऐसा कमेंट | Bigg Boss contestant Urfi Javed gets trolled for her backless dress and showing spots on her back". एशियानेटन्यूझ (हिंदी भाषेत). ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "उर्फी जावेद ने क्यों कहा कि एक मुस्लिम होने के नाते उन्हें ट्रोल किया जाता है ! भाषा=हिंदी". आवाज द व्हॉइस. ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उर्फी जावेद चे पान (इंग्लिश मजकूर)