मुग्धबलाक

(उघड्या चोचीचा करकोचा या पानावरून पुनर्निर्देशित)

आशियाई मुग्धबलाक,घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा करकोचा (इंग्रजी: एशियन ओपन बिल किंवा एशियन ओपन बिल स्टॉर्क) हा करकोचा जातीचा पक्षी असून नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावर याच्या चोचीतील फट स्पष्टपणे दिसते.

मुग्धबलाक
शास्त्रीय नाव
(Anastomus oscitans)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश एशियन ओपनबिल
(Asian Openbill)
संस्कृत शंबूक भंजन
हिंदी घोंघिल, गुंग्ला

वर्णन

संपादन

उघड्या चोचीच्या करकोच्याच्या चोचीमध्ये अडकित्त्याप्रमाणे फट असते. चोच बंद केली तरी ही फट दिसते. याची शेपटी काळी असते. तसेच उड्डाण पिसे काळी असतात. पाय मळकट गुलाबी रंगाचे असतात. ते विणीच्या हंगामात गडद गुलाबी होतात.

खाद्य

संपादन

पाण्यातील शंख, शिंपल्यातील मृदुकाय प्राणी, बेडूक, खेकडे, गोगलगायी, पाण्यातील कीटक इ. खातो.

भारतातील हा स्थानिक रहिवासी पक्षी आहे. भातखाचरे, सरोवरे, तळी, खाडया अशा पाणथळ जागेत हा पक्षी वास्तव्यास असतो.[] महाराष्ट्रातसुद्धा हा पक्षी सर्वत्र आढळतो.

बाह्य दुवे

संपादन

चित्रदालन

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Grimmett, Inskipp and Inskipp. Birds of India. ISBN ISBN 0-691-04910-6 Check |isbn= value: invalid character (सहाय्य).