उकडणे किंवा वाफवणे (इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ;) ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.

अन्न वाफवण्याची, अर्थात उकडण्याची भांडी व उपकरणे - डावीकडे स्टेनलेस स्टीलचे आधुनिक यंत्र, तर उजवीकडे बांबूंपासून बनवलेली चिनी बनावटीची वाफवणी

पाण्याचा उत्कलनबिंदू १०० अंश सेल्शियस असतो. त्यामुळे जे अन्नपदार्थ उच्च तापमानाला खराब व्हायची शक्यता असते, ते अन्नपदार्थ या तापमानास न बिघडता सहज शिजतात. या प्रक्रियेत एखाद्या भांड्यात किंवा प्रेशर कुकरसारख्या वाफवण्याच्या यंत्रात थोडे पाणी टाकून, त्यावर अन्नपदार्थ ठेवले जातात. सहसा अन्नपदार्थ पाण्याच्या संपर्कात येऊ न देता भांड्यात अन्य आधारावर तोलला जाईल, अशा बेताने ठेवला जातो. भांड्याचे झाकण लावून त्यास विस्तवावर ठेवले जाते.


 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत