गरुड योद्धा

(ईगल वॉरियर या पानावरून पुनर्निर्देशित)

ऍझटेक सैन्यामध्ये सैनिकांचा एक खास विभाग होता, त्या प्रकारच्या सैनिकाला गरुड योद्धा (अभिजात नाहुआट्ल: कुऔहट्ली, इंग्लिश - ईगल वॉरिअर किंवा ईगल नाईट) म्हणले जाई. जाग्वार योद्ध्यांप्रमाणेच गरुड योद्धा होणे खानदानी लोकांपुरतेच मर्यादित होते.

एक गरुड योद्धा (डावीकडे) माक्वाहुइट्ल धरून आहे, हे दृष्य


शिक्षण

संपादन

सगळ्या ऍझटेक मुलांप्रमाणे हे योद्धेसुद्धा युद्धकला आणि शस्त्रास्त्रांची माहिती शाळेत शिकत. काही झाले तरी, शेवटी उत्तम विद्यार्थीच गरुड योद्धा होई.

१४वे शतक येईपर्यंत अझ्टेक मुलांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या हाती असे. त्यानंतरच्या काळात मात्र कालपुल्लीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाऊ लागली. ठराविक काळानंतर ते त्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रार्थनास्थळांकडे लक्ष देऊ लागले.

गरुड योद्धा बनण्याचा विधि

संपादन

बालयोद्धा एकदा तरुण झाला की त्याला त्याचा पहिला कैदी पकडून दाखवावा लागे. सामान्यत:, जाग्वार योद्धाप्रमाणेच गरुड योद्धा हे नामाभिधान प्राप्त करण्यास त्यांना ४ किंवा ५ कैदी एका लढाईत पकडावे लागत.

लढाईतील डावपेच

संपादन

ऍझटेक योद्धे लढाईत शत्रूसैनिकाचा पाय निकामी करण्याचा प्रयत्‍न करीत, त्यामुळे त्या जखमी सैनिकाला कैदी म्हणून नेण्यास सोपे जाई. कैदी हे विजयचिन्हाची ऍझटेक आवॄत्ती होती; परंतु ते हे "विजयचिन्ह" फार काळ बाळगत नसत. त्यांच्यापैकी एकाला देवाला बळी देत.

सैन्यातील स्थान

संपादन

जाग्वार योद्ध्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर गुप्तहेरांप्रमणे केला जाई. त्यापेक्षा हे गरुड योद्धे वेगळे होते. त्यांचा वापर टेहळणी करणाऱ्या हेरांसारखा केला जाई, त्याचबरोबर युद्ध चालले असताना पायदळी सैनिकांप्रमाणे त्यांना वापरत. युद्धात माक्वाहुइट्ल आणि इतर शस्त्रे (ऍट्ल-ऍट्ल, भाले इ.) वापरत. गरुड योद्धे लांबलांबची अंतरे कमी वेळात पार करू शकत; ह्या कारणाने अझ्टेक सम्राटाचा जासूद म्हणूनही त्यांचा उपयोग केला जाई.

गणवेश

संपादन

त्यांचा गणवेश त्यांच्या अंगी असलेल्या बळाची आणि लढाईसाठी लागणाऱ्या धैर्याची निशाणीच होता. त्यांच्या ढाली रंगाने चकचकीत असून पिसांनी आच्छादलेल्या असत. त्यांच्या पायांवर चामडी पट्टी असे. प्राचीन काळात गुडघ्याखाली वापरायच्या संरक्षक कवचाची ही अझ्टेक आवृत्ती होय.

त्यांच्या माथ्यावर गरुडाचे डोके बसवलेले असे; आणि त्यांच्या गणवेशावर गरुडाची पिसे लावलेली असत.

शस्त्रास्त्रे

संपादन

अझ्टेक योद्धे ऍट्ल-ऍट्ल, धनुष्य, भाले आणि खंजीर अशी विविध शस्त्रे वापरीत. अझ्टेक लोक तलवार व भाले यांसाठी झटकन थंड झालेल्या लाव्हा रसापासून बनलेल्या ऑबसिडियन काचेचे पाते तयार करीत असत. असे पाते पोलादापासून केलेल्या पात्यापेक्षा धारदार असे. परंतु त्याची धार फार काळ टिकत नसे. ती पाती उपयोगात आणल्यानंतर लगेच आपला धारदारपणा गमावत. हे योद्धे मेसोअमेरिकन हवामानास योग्य ठरतील असे वजनाने हलके उरस्त्राण (छातीवरील संरक्षक पत्रा) वापरीत.

 
एज ऑफ एम्पायर ३मधील ईगल वॉरियर

लोकप्रिय गोष्टींमध्ये....

संपादन
 
एज ऑफ एम्पायर २: द कॉन्करर एक्स्पान्शनमधील ईगल वॉरियर

हे सुद्धा पहा

संपादन

अस्तेक - Aztec(s)

गरुड योद्धा - Eagle Warrior (or) Eagle Knight

जाग्वार योद्धा - Jaguar Warrior (or) Jaguar Knight

कालपुल्ली - Calpulli

माक्वाहुइट्ल - Maquahuitl

ऍट्ल-ऍट्ल - Atl-Atl

ऑबसिडियन - Obsidian

मेसोअमेरिकन - Mesoamerican

गुडघ्याखालील संरक्षक कवच - Greaves

कुऔहट्ली - Cuāuhtli

उरस्त्राण - Breastplate