तुरुंग

(कैदी या पानावरून पुनर्निर्देशित)

अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणाऱ्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.

अन्य शब्द

संपादन

तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, असे अनेक शब्द आहेत.

महाराष्ट्र राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, ३१ जिल्हा तुरुंग, १९ खुले तुरुंग, १७२ उपतुरुंग आणि एक खुली वसाहत, महिलांसाठी खुले तुरुंग २ आहेत

महाराष्ट्रातील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे

संपादन
  • अमरावती
  • छत्रपती संभाजी नगर (हर्सूल)
  • कोल्हापूर (कोळंबा)
  • ठाणे
  • तळोजा (खारघर, नवी मुंबई)
  • नागपूर
  • नाशिक रोड
  • पुणे (येरवडा)
  • मुंबई (आर्थर रोड)

पहिल्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

संपादन
  • अकोला
  • कल्याण
  • चंद्रपूर
  • धुळे
  • नाशिक (बालतुरुंग)
  • बुलढाणा
  • भंडारा
  • यवतमाळ
  • रत्‍नागिरी
  • वर्धा

दुसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

संपादन

अलिबाग, अहमदनगर, उस्मानाबाद, जळगाव, नांदेड, परभणी बीड, बुलढाणा, भायखळा, येरवडा (महिला तुरुंग), विसापूर, सांगली, सातारा, सावंतवाडी, सोलापूर.

तिसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

संपादन
  • जे.जे. हॉस्पिटल (भायखळा-मुंबई)
  • कोल्हापूर जिल्हा तुरुंग

पहिल्या वर्गाचे खुले तुरुंग

संपादन
  • पैठणचा खुला तुरुंग
  • येरवडा-पुणे येथील खुला तुरुंग

दुसऱ्या वर्गाचे खुले तुरुंग

संपादन
  • औरंगाबाद खुला तुरुंग

कैद्यांसाठी खुली वसाहत

संपादन
  • आटपाडी (सांगली जिल्हा)

उपतुरुंग

संपादन

हा अतिशय छोटा तुरुंग असून यात कैद्यांची संख्याही अत्यल्प असते. या तुतुंगाची व्यवस्था तुरुंग-खाते बघत नाही, तर महसूल खात्याकडे याची देखभाल असते. तालुक्याचा मामलेदार या तुरुंगावरचा अधिकारी असतो. हे तुरुंग बहुधा तालुक्याच्या मुख्यालयाच्या गावी असतात.

पॅरोल आणि फर्लो

संपादन

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल (संचित रजा) आणि फर्लो (अभिवचन रजा) नावाच्या सुट्ट्यांवर तुरुंगाबाहेर जायला मिळते. यातील फर्लो रजा मिळणे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. थोड्याथोड्या दिवसांनी कैद्याला आपल्या कुटुंबात रहावयास मिळावे आणि त्याचे सामाजिक संबंध स्थापित रहावे म्हणून ही रजा असते. फर्लो (Furlough) मिळण्यासाठी कैद्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही. फर्लोचा कालावधी ही शिक्षेतले सूट समजली जाते.

कैद्याचे जवळचे नातेवाईक आजारी असतील, किंवा घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर कैदी संचित रजेसाठी अर्ज करू शकतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यावर, कैद्याचे तुरुंगातले वर्तन पाहून आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवूनच ही रजा दिली जाते. कारागृहाचा अधिकारी १४ दिवसांची संचित रजा देऊ शकतो, तर संबंधित विभागीय आयुक्त ३० दिवसांपर्यंत संचित रजा देऊ शकतात. यात वाढही होऊ शकते.

संजय दत्तला मे २०१३मध्ये कैदेची शिक्षा झाली. मे २०१५ पर्यंत त्याला पाच महिने रजा (पॅरोल व फर्लो) मिळाली होती. त्यानंतर पुन्हा मुलीच्या नाकाच्या शस्त्रक्रियेचे कारण दाखवून त्याला ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संचित रजा मंजूर केली.