इडो किल्ला
इडो किल्ला (江戸城), तथा चियोदा किल्ला (城 田 城) हा जपानमधील एक भुईकोट किल्ला आहे. याची रचना १४५७ मध्ये एता दाकानने केली होती. हा किल्ला आता तोक्यो शाही महालाचा एक भाग आहे. सध्याच्या मुयोशी प्रांताच्या तोशिमा जिल्हा, चियोदा गावाजवळ अशलेल्या या किल्ल्याला आधी इदो म्हणून ओळखले जात असे.[१] तोकुगावा इयेआसू यांनी येथे तोकुगावा शोगुनतीची स्थापना केली. हे शोगुनचे निवासस्थान आणि शोगुनतीचे मुख्यालय होते आणि जपानी इतिहासाच्या इदो काळात लष्करी राजधानी म्हणून देखील कार्यरत होती. शोगुनच्या राजीनाम्यानंतर आणि मेजीच्या पुनर्स्थापनेनंतर या किल्ल्याचे रूपांतर शाही निवासस्थानात केले गेले. किल्ल्याचे काही खंदके, भिंती आणि तटबंदी अजूनही तशाच आहेत. इदो कालावधीत हा किल्ला अधिक मोठा होता. सध्याचे तोक्यो स्थानक आणि तोक्यो शहराचा मारुनुची विभाग सर्वात बाह्य खंदक मध्ये बनविलेला आहे. तसेच यात कितानोमारू पार्क, निप्पॉन बुडोकान हॉल आणि आसपासच्या परिसरातील इतर खुणादेखील आहेत.[२]
इडो किल्ला 江戸城 | |
---|---|
चियोडा, तोक्यो, जपान | |
हे एक १7 व्या शतकातील इडो किल्ल्याचे स्क्रीन पेंटिंग आहे. यात आसपासचे निवासी वाडे आणि खंदक दिसत आहेत . | |
प्रकार | भूईकोट किल्ला |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित | इम्पिरियल हाउसहोल्ड एजन्सी |
परिस्थिती | बहुतेक ठिकाणी पडझड झालेले अवशेष आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर कही भागांची पुनर्रचना केली होती. सध्या तोक्यो इम्पीरियल पॅलेस म्हणून वापरात आहे. |
Site history | |
बांधले | १४५७ |
याने बांधले | एटा डेकन, टोकुगावा इयेआसू |
सध्या वापरात | १४५७ – सध्या (तोक्यो इम्पीरियल पॅलेस म्हणून) |
साहित्य | ग्रेनाइट दगड, मातीची गढी, लाकूड |
उध्वस्त झालेले | १६५७ मध्ये तेन्शु (कोठार) आगीने नष्ट झाले होते, बाकीचा बहुतेक भाग ५ मे १८७३ रोजी दुसऱ्या मोठ्या आगीमुळे नष्ट झाला होता. सध्या तोक्यो इम्पीरियल पॅलेस म्हणून वापरात आहे. |
किल्ल्यात ठेवलेली शिबंदी | |
रहिवासी | टोकुगावा शोगुनेट, मीजी कालावधीपासून जपानी सम्राट आणि शाही कुटुंब |
इतिहास
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हियन कालावधीच्या शेवटी किंवा कामाकुराच्या काळाच्या सुरुवातीस, योद्धा इडो शिगेत्सुगुने आपले निवास इडो केल्ल्याच्या होनमारू आणि निनोमारू भागात बनवले. १५ व्या शतकात कॅंटो प्रदेशातील बंडखोरीमुळे इडो कुळाने हा भाग सोडला. ओगीगायत्सु उईसुगी घराण्याचा सांभाळ करणाऱ्या एटा डेकन यांनी १४५७ मध्ये इडो किल्ला बांधला. १५२४ मध्ये इडो किल्ल्याला वेढ्या घालून आणि जिंकून हा किल्ला होजो कुळाच्या ताब्यात आला.[३] १५९० मध्ये ओडवाराच्या वेढ्यामुळे हा किल्ला रिकामा झाला होता. टोयोटोमी हिडेयोशीने पूर्वोत्तर आठ प्रांताचा ताबा दिल्यानंतर टोकुगावा इयेआसूने इडो किल्ल्याला स्वतःची लष्करी छावणी बनवली.[१] नंतर त्यांनी १६१५ मध्ये ओसाकाचा वेढा घालून हियोयोशीचा मुलगा टोयोटोमी हिडेयोरीचा पराभव केला आणि ते जपानचे राजकीय नेते म्हणून उदयास आले. १६०३ मध्ये टोकुगावा इयेआसू यांना सेई-आय तायशगुन ही पदवी मिळाली आणि इडो टोकुगावाच्या कारभाराचे मुख्य केंद्र बनले.
सुरुवातीला या परिसरातील काही भाग पाण्याखाली होता. इडो किल्ल्याच्या सध्याच्या निशिनोमारू भागात समुद्र पोहोचला होता आणि हिबिया एक समुद्र किनारा होता. [स्पष्टीकरण हवे] किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी याची रचना बदलण्यात आली.[४] याचे बहुतेक बांधकाम १५९३ मध्ये सुरू झाले आणि १६३६ मध्ये इयेआसूचे नातू तोकुगावा इमिट्सू यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. यावेळी, इडोची लोकसंख्या १,५०,००० पोहचली होती.[५]
सध्याचे होन्नारू, निनोमारू आणि सन्नोमारू भाग निशिनोमारू, निशिनोमारू-शित, फुकिएज आणि कितानोमारू भागांना जोडण्यात आले होते. किल्ल्याचा परिघ १६ किमी होता.
या किल्ल्याच्या बांधकामाची सामग्री आणि पैसा सुभेदार (डॅम्योज्) कडून घेण्यात येत असे, याद्वारे शॅमगुनेट सुभेदारांवर वचक ठेवत असे. मोठे ग्रेनाइट दगड लांब अंतरावरून आणले गेले, या दगडांचे आकार आणि संख्या सुभेदारांनी दिलेल्या संपत्तीवर अवलंबून असे. श्रीमंत सुभेदारांना अधिक जास्त योगदान द्यावे लागत असे. ज्यांनी अशा दगडांचा पुरवठा केला नाही त्यांना मोठे खंदक खोदणे आणि टेकड्यांच्या सपाटीकरणासाठी कामगार पुरवणे आवश्यक होते. खंदकांतून काढलेली माती समुद्रात भर टाकण्यासाठी किंवा जमिन सपाट करण्यासाठी वापरली जात होती. अशाप्रकारे इडो किल्ल्याच्या बांधकामामुळे शहराच्या अशा काही भागाची पायाभरणी झाली जिथे नंतर व्यापारी स्थायिक होऊ शकले.
संदर्भ
संपादन- ^ a b "Map of Bushū Toshima District, Edo". World Digital Library. 6 May 2013 रोजी पाहिले.
- ^ 熱海市教育委員会 (2009-03-25). "熱海市内伊豆石丁場遺跡確認調査報告書". Comprehensive Database of Archaeological Site Reports in Japan. 2016-09-02 रोजी पाहिले.
- ^ Turnbull, Stephen (1998). The Samurai Sourcebook. Cassell & Co. p. 208. ISBN 1854095234.
- ^ Schmorleitz, pg. 101
- ^ Schmorleitz, pg. 103