इंदुमती जोंधळे या एक मराठी लेखिका आहेत. औरंगाबादच्या सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये त्यांनी ३५ वर्षं नोकरी केली. पुढे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होऊन निवृत्त झाल्या. शाळांशाळांत जाऊन त्या व्याख्याने देतात.

इयत्ता १०वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात इंदुमती जोंधळे यांचा 'आत्मनिर्भरतेसाठीची वाटचाल' हा धडा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होता.

पुस्तके संपादन

  • A Doorless Frame (इंग्रजी, आत्मकथनात्मक)
  • कर्मयोगी अण्णासाहेब सहस्रबुद्धे (चरित्र)
  • अस्वस्थ श्वासांची डायरी (कथासंग्रह)
  • पाषणनिद्रा (कथासंग्रह)
  • फुलझडी (नाटक, बालसाहित्य)
  • बिनपटाची चौकट (आत्मकथन)
  • बेदखल (कथा)
  • रससिद्धांताचा प्रदेश (सामाजिक, सहलेखक महावीर जोंधळे)

पुरस्कार संपादन

1. बेदखल – महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार.

2. कै. मुकुंदराव पाटील ‘दीनमित्र’ पुरस्कार – अ’नगर.

• शैक्षणिक- सामाजिक 1.आकाशवाणीवरून प्रसारित होणा-या विविध कार्यक्रमात सहभाग लेखन, वाचन, कथा – स्फूटलेखन- नाट्य- शैक्षणिक.

2.आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून ‘बिनपटाची चौकट’चे वर्षभर क्रमशः वाचन. दोन वर्ष महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारित.

3.स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री आत्मकथने- पेपर वाचन -साहित्य अकादमी मुंबई.