अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी (जन्म : १४ जानेवारी १९१९; - १० मे]] २००२) हे एक भारतीय उर्दू-हिंदी कवी, पटकथालेखक, अभिनेते, शायर व गीतकार होते. कैफी आझमी यांचे जन्म नाव अख्तर हुसेन रिझवी होते. कैफी हे त्यांचे टोपणनाव होय.

कैफी आझमी
जन्म नाव अख्तर हुसेन रिझवी
टोपणनाव कैफी
जन्म १४ जानेवारी, इ.स. १९१९
मिझवां, उत्तर प्रदेश
मृत्यू १० मे, इ.स. २००२
मुंबई
धर्म इस्लाम
भाषा उर्दू
साहित्य प्रकार कविता, गीते, शायरी
संघटना कम्युनिस्ट पार्टी
पत्नी शौकत कैफी
अपत्ये शबाना आझमी, बाबा आझमी
पुरस्कार पद्मश्री, साहित्य अकादमी, ज्ञानेश्वर पुरस्कार (१९९८)
संकेतस्थळ Kaifi Azmi

सुरुवातीचे जीवनसंपादन करा

कैफी आझमी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मिझवां (आताच्या आझमगढ जिल्ह्यातील ) या खेड्यात झाला. कैफी यांचे कुटुंब कट्टर शियापंथी होते. त्यांचे वडील गावचे जमीनदार होते.[१]

कैफ़ी यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदरशामध्ये घातले होते. पण त्यांना ते न पटल्यामुळे त्यांनी तेथील शिक्षण सोडून दिले.

कैफ़ी आझ़मी यांची गीते असलेले हिंदी चित्रपटसंपादन करा

 • अनुपमा (१९६६)
 • अर्थ (१९८२)
 • ईद का चॉंद (१९५८)
 • उसकी कहानी (१९६६)
 • कागज़ के फूल (१९५९)
 • कोहरा (१९६४)
 • गरम हवा (१९७३)
 • नसीम (अभिनय, १९९५)
 • नौनिहाल (१९६७)
 • परवाना (१९७१)
 • परवीन (१९५७)
 • पाकिझा (१९७२)
 • बावर्ची (१९७२)
 • बुझदिल (१९५१)
 • मंथन (संवाद, १९७६)
 • मिस पंजाब मेल (१९५८)
 • यहूदी की बेटी (१९५६)
 • रझिया सुलतान (१९८३)
 • रामा (संवाद, १९७७)
 • शोला और शबनम (१९७१)
 • सात हिंदुस्तानी (१९६९)
 • हक़ीक़त (१९६४)
 • हंसते जख्म (१९७३)
 • हीर रांझ़ा (१९७०)

कैफ़ी आझ़मी यांच्या गझ़लांची प्रकाशित पुस्तकेसंपादन करा

 • आजके प्रसिद्ध शायर : कैफ़ी आझ़मी (आत्मचरित्र)

(अपूर्ण यादी)

कैफ़ी आझ़मी यांच्या जीवनावरील आणि शायरीवरील पुस्तकेसंपादन करा

 • कैफ़ियत (ऑडियो बुक). यातील गझ़ला कैफ़ी आझ़मी यांनी गायल्या आहेत.
 • कैफी आझमी - जीवन आणि शायरी (लक्ष्मीकांत देशमुख)
 • कैफी आझमी २००२ मध्ये निवर्तल्यानंतर, २००४ सालात 'याद की रहगुजर' हे त्यांच्या सहप्रवाशांच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले.
 • दीक्षा (माहितीपट, २०१५, दिग्दर्शक - रमणकुमार)

संदर्भसंपादन करा

 1. ^ पवार, जयंत. "कैफीयत: 'कैफी'यत - kaifi azmi an indian urdu poet". Maharashtra Times.

संदर्भसूचीसंपादन करा