इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९२ दरम्यान एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. एकमेव कसोटी महिला ॲशेस अंतर्गत खेळविण्यात आली. इंग्लंडने नुकतेच न्यू झीलंड महिलांना तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने हरवले होते. त्यानंतर न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबर महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला होता. तिरंगी मालिकेत इंग्लंड महिलांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. परंतु अंतिम सामन्यात आलेल्या पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता आणि गट फेरीत ऑस्ट्रेलिया महिला अव्वल राहिल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १९ – २३ फेब्रुवारी १९९२ | ||||
संघनायक | लीन लार्सेन | हेलेन प्लीमर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेनिस ॲनेट्स (१४८) | वेंडी वॉट्सन (६४) | |||
सर्वाधिक बळी | इसाबेल साकिरीस (७) चर्मिन मेसन (७) |
कॅरॉल हॉज (२) |
एकमेव महिला कसोटी सामना नॉर्थ सिडनी ओव्हलवर खेळविण्यात आला. इंग्लंड महिलांनी कसोटीत खराब खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची डेनिस ॲनेट्स हिच्या नाबाद १४८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी कसोटी सामना १ डाव आणि ८५ धावांनी जिंकत महिला ॲशेस चषक राखला.
महिला कसोटी मालिका
संपादनएकमेव महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- किम फॅझाकर्ली, ली-ॲन हंटर, शार्मेन मेसन, इसाबेल साकिरीस (ऑ), जेन स्मिट आणि जॅनेट गॉडमन (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.