आल्फ्रेदो स्त्रॉसनर

आल्फ्रेदो स्त्रॉसनर मात्याउदा (स्पॅनिश: Alfredo Stroessner Matiauda; ३ नोव्हेंबर १९१२ - १६ ऑगस्ट २००६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशाचा एक लष्करी अधिकारी व हुकुमशहा होता. १९५४ साली एका लष्करी बंडाद्वारे स्त्रॉसनरने पेराग्वेची सत्ता बळकावली. पुढील ३५ वर्षे पेराग्नेच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या स्त्रॉसनरने त्याच्या कार्यकाळात सर्व राजकीय विरोधकांना डांबून ठेवले व पेराग्वेमधील जनतेच्या मानवी हक्कांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली केली. त्याच्या कट्टर कम्युनिस्ट-विरोधी विचारांमुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचा स्त्रॉसनरला पाठिंबा होता.

आल्फ्रेदो स्त्रॉसनर

पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९५४ – ३ फेब्रुवारी १९८९
मागील फेदेरिको चावेझ
पुढील आंद्रेस रॉद्रिग्वेझ

जन्म ३ नोव्हेंबर, १९१२ (1912-11-03)
एन्कार्नासियोन, पेराग्वे
मृत्यू १६ ऑगस्ट, २००६ (वय ९३)
ब्राझिलिया, ब्राझील

१९८९ साली आंद्रेस रॉद्रिग्वेझने केलेल्या एका लष्करी बंदामध्ये स्त्रॉसनरला सत्ता सोडावी लागली. त्याने ब्राझीलला पलायन केले व मृत्यूपर्यंत पुढील १७ वर्षे तो ब्राझिलिया येथे वास्तव्यास होता.

बाह्य दुवे

संपादन