आर्णी विधानसभा मतदारसंघ
आर्णी विधानसभा मतदारसंघ - ८० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आर्णी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. आर्णी २. घाटंजी ही दोन तालुके आणि ३. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा ही महसूल मंडळे आणि पांढरकवडा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे संदिप प्रभाकर धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनआर्णी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- आर्णी तालुका
- घाटंजी तालुका
- केळापूर तालुका : पाटणबोरी आणि पांढरकवडा महसूल मंडळ; पांढरकवडा नगरपालिका
आर्णी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादनवर्ष | आमदार | पक्ष | |
---|---|---|---|
२००९ पूर्वी: केळापूर विधानसभा मतदारसंघ | |||
२००९ | शिवाजीराव शिवरामजी मोघे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | राजु नारायण तोडसाम | भारतीय जनता पक्ष | |
२०१९ | संदिप प्रभाकर धुर्वे | ||
२०२४ | निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
आर्णी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शिवाजीराव शिवरामजी मोघे | काँग्रेस | ९०८८२ |
उत्तम राघोबाजी इंगळे | भाजप | ५३,३०१ |
राजू नारायण तोडसाम | अपक्ष | ५५३० |
शिवराम निरंजन मासराम | गोंगपा | ५,१४५ |
लक्ष्मणराव सोनबाजी वेलाडे | बसपा | ३,५८४ |
गोविंदा गंगाराम सिदाम | माकप | ३,०८० |
भाऊराव किसन मारपे | शिपा | २५९५ |
विष्णू शंकरराव उकांडे | जसुश | १५५४ |
नेताजी सीतारामजी किनाके | अपक्ष | १०५९ |
हरीभाऊ कावडूजी पेंडोर | अपक्ष | ८१५ |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).