आरवली (वेंगुर्ला)

(आरवली(वेंगुर्ला) या पानावरून पुनर्निर्देशित)

आरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे.

  ?आरवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वेंगुर्ला
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

श्रीदेव वेतोबा मंदिर

वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. रस्त्यावरूनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेव भूमय्या, देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुद्ध १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. योगी राज बापूमामा केणी महाराजांचे आरवलीच्या या श्रीदेव वेतोबास श्रीदेव विठ्ठल मानून भजत असत. आरवलीच्या वेतोबा देवस्थानात योगीराज बापूमामा केणी यांचा पाडवा नावाचा समारंभ ज्येष्ठ शुद्ध प्रतिपादेस करतात. जेव्हा वेतोबा देवस्थानात काही अडचण किंवा संकट निर्माण होते तेव्हा बापू मामांना हाक मारून त्यांचा अंधार उभा राहिल्यावर त्यांचा सल्ला घेतला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे. तर देवालय दुमजली आहे.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/