आय.एन.एस. विक्रमादित्य

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.[१]

आयएनएस विक्रमादित्य

याआधी विक्रमादित्य सोव्हियेत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..

सामीलसंपादन करा

हे विमानवाहू जहाज दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करण्यात आले आहे. रशियाच्या सेवमाश शिपयार्ड येथे ते जहाज भारतीय नौदलाच्या स्वाधीन करण्यात आले. हे जहाज भारतात पोचण्यास दोन महिन्याचा अवधी लागला.[१] यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.[२]

इतर माहितीसंपादन करा

  • किंमत - २.३ अब्ज डॉलर
  • वजन - ४४५०० टन
  • लांबी - २८४ मीटर[१]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा