आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट २०२० दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले. आधीच्या वेळापत्रकानूसार ही मालिका सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती परंतु कोविड-१९ हा साथीचा रोग सर्व जगात फैलावल्यामुळे मालिका सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली. तदनंतर सामन्यांचे वेळापत्रक पुन्हा बनवून मालिका जुलै अखेरिस नियोजित केली गेली. सर्व सामने हे साउथहँप्टनच्या रोझ बाऊल येथे खेळविण्यात आले.
आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० | |||||
इंग्लंड | आयर्लंड | ||||
तारीख | ३० जुलै – ४ ऑगस्ट २०२० | ||||
संघनायक | आयॉन मॉर्गन | अँड्रु बल्बिर्नी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | आयॉन मॉर्गन (१४२) | पॉल स्टर्लिंग (१५६) | |||
सर्वाधिक बळी | डेव्हिड विली (८) | क्रेग यंग (६) | |||
मालिकावीर | डेव्हिड विली (इंग्लंड) |
इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकत मालिका जिंकली. आयर्लंडने शेवटच्या सामन्यात अनपेक्षीतरित्या इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंड मध्ये आयर्लंडचा इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिलाच विजय ठरला.
पार्श्वभूमी
संपादनक्रिकेट आयर्लंडच्या सीईओ वॉरेन ड्युट्रोम यांनी स्पष्ट केले की कोविड-१९ मुळे आम्ही (आयर्लंड) सामन्यांचे वेळापत्रकात बदल करण्यास तयार आहेत. इंग्लंडने मॅंचेस्टर आणि साउथहँप्टनमध्ये बंद दाराआड सामने खेळविण्यास ब्रिटिश सरकारने परवानगी दिली आहे असे जाहिर केले. मे २०२० मध्ये इंग्लंडने आयर्लंडला इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी फेरबदल करण्यासाठी जुलैच्या अखेरीस दौरा हलविता येईल का, असे विचारले गेले. त्याच महिन्याच्या शेवटी क्रिकेट आयर्लंडने याची पुष्टी केली की न्यू झीलंड आणि पाकिस्तानविरुद्धची घरची मालिका रद्द केली आहे.
२१ मे २०२० रोजी इंग्लंडने आयर्लंड दौऱ्याची तत्त्वता घोषणा केली. सर्व सामने प्रथम ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार होते परंतु नंतर सामने साउथहँप्टनला हलविण्यात आले. २९ मे २०२० रोजी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आधी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी ५५ खेळाडूंची नावे जाहिर केली. ८ जून २०२० रोजी क्रिकेट आयर्लंडने पुष्टी केली की केंद्रीय करारातील खेळाडू प्रशिक्षणाला पुन्हा सुरुवात करतील आणि ते तीन सामने खेळण्याच्या संदर्भात अद्याप ईसीबीशी चर्चा करीत आहेत. आयर्लंडचा कर्णधार अँड्रु बल्बिर्नी म्हणाला की, ईसीबीने अत्यंत आश्वासन देऊन थोडक्यात माहिती दिली की मालिका पुढे जाईल अशी मला आशा आहे. आयर्लंडचा यष्टिरक्षक गॅरी विल्सन म्हणाला की, "इंग्लंडविरुद्धची मालिका आमच्यासाठी भव्य आहेत" आणि मालिका पुढे जाण्यासाठी प्रत्येकजण आपल्यापरीने पराकाष्ठा करत आहेत. ६ जुलै २०२० रोजी, ईसीबी आणि क्रिकेट आयर्लंडने मालिकेसाठी हिरवा कंदील दिला आणि वेळापत्रक निश्चित केले गेले.
वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी ज्यांना निवडण्यात आले नव्हते त्या खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांसाठी सराव सुरू केला. ९ जुलै २०२० रोजी ईसीबीने एकदिवसीय सामन्यांच्या तयारीसाठी बंद दारामागील प्रशिक्षण सुरू करण्यासाठी २४ सदस्यीय पथकाचे नाव जाहिर केले. दुसऱ्या दिवशी क्रिकेट आयर्लंडने एकवीस खेळाडूंच्या पथकाला इंग्लंडला जाण्यासाठी नेमले. सराव सामन्यांनंतर चौदा खेळाडू एकदिवसीय संघात निवडले जातील व उर्वरित खेळाडू राखीव खेळाडू इंग्लंडमध्ये राहतील. संघ डब्लिनमधून निघण्यापूर्वी १८ जुलै २०२० रोजी क्रिकेट आयर्लंडने स्टुअर्ट थॉम्पसनला त्यांच्या दौऱ्या संघात जोडले. २१ जुलै २०२० रोजी ईसीबीने एकदिवसीय मालिकेसाठी मोईन अलीला इंग्लंडचा उपकर्णधार म्हणून नेमले.
जून २०२० मध्ये साथीच्या आजारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) खेळण्याच्या परिस्थितीत अनेक अंतरिम बदल केले. चेंडूला चकाकी आणण्यासाठी खेळाडूंना लाळ वापरण्यास बंदी घातली गेली, वारंवार उल्लंघन केल्याबद्दल विरोधी संघाला पाच दंडीय धावा देण्याचा नियम बनवला गेला. तटस्थ पंचांना नेमायच्या नियमात बदल केला गेला. त्यामुळे सामन्यात अनुभवी पंच कमी झाल्यामुळे संघांना पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस)ची वापर संख्या वाढवून दिली गेली.
सराव सामने
संपादनएकदिवसीय मालिकेपूर्वी आयर्लंड दोन सराव सामने खेळेल त्यातील दुसरा सामना इंग्लंड लायन्सविरुद्धचा असेल.
४० षटकांचा सामना: टीम मोईन वि. टीम मॉर्गन
संपादनटीम मोईन
३२५/९ (४० षटके) |
वि
|
टीम मॉर्गन
२२५ (३२.३ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, टीम मोईन ने प्रथम फलंदाजी निवडली.
५० षटकांचा सामना: आयर्लंड वि. आयर्लंड वूल्व्स
संपादनवि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
४० षटकांचा सामना: टीम मोईन वि. टीम विन्स
संपादनटीम मोईन
१०८ (२८.४ षटके) |
वि
|
टीम विन्स
१०९/४ (१७.४ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, टीम मोईन ने फलंदाजी निवडली
५० षटकांचा सामना: इंग्लंड लायन्स वि. आयर्लंड
संपादनवि
|
इंग्लंड लायन्स
२९७/३ (३४.४ षटके) | |
अँड्रु बल्बिर्नी ६० (७३)
टॉम हेम ३/४९ (८.४ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- कुर्तीस कॅम्फर आणि हॅरी टेक्टर (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- या सामन्याने २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी खेळवल्या जाणाऱ्या कसोटी देशांच्या पात्रता फेरीची सुरुवात झाली.
- विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, आयर्लंड - ०.
२रा एकदिवसीय सामना
संपादन
३रा एकदिवसीय सामना
संपादन