आयन रॅंड (इंग्लिश: Ayn Rand ;), जन्मनाव अलिसा झिनोव्येव्ना रोझेनबाउम (रशियन: Алиса Зиновьевна Розенбаум ; रोमन लिपी: Alisa Zinov'yevna Rosenbaum ;), (फेब्रुवारी २, इ.स. १९०५; सेंट पीटर्सबर्ग, रशिया - मार्च ६, इ.स. १९८२; न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ही रशियन-अमेरिकन लेखिका, तत्त्वज्ञ, नाटककार आणि पटकथाकार होती. तिने विकसवलेली वस्तुनिष्ठतावाद् ही तात्त्विक विचारप्रणाली प्रसिद्ध आहे. रशियात जन्मलेली व शिकलेली आयन रॅंड इ.स. १९२६ साली अमेरिकेला स्थलांतरित झाली. तिने पटकथाकार म्हणून हॉलीवुडात काम केले व इ.स. १९३५-३६ या काळात ब्रॉडवेसाठी एक नाटक निर्मिले. द फाउंटनहेड या इ.स. १९४३ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीने ती पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली. इ.स. १९५३ साली तिची दुसरी प्रसिद्ध महाकादंबरी अ‍ॅटलास श्रग्ड प्रकाशित झाली.

बाह्य दुवे

संपादन