आनंद म्हसवेकर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आनंद म्हसवेकर ऊर्फ तुकाराम कांबळे हे एक मराठी नाट्यलेखक आणि दिग्दर्शक होते.
परिचय
संपादनह्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.कॉम आणि एम.ए.ची पदवी प्राप्त केली होती. ते इसवी सन १९७९ ते इसवी सन २००० पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियात काम करीत होते. नंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखन केले. त्यांनी ३८ नाटके लिहिली. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
त्यांनी बरेच चित्रपट लिहिले.त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
त्यांनी मालिकांचे लेखन केले. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
त्यांनी खालील चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
त्यांना यू टर्न नाटकासाठी २००९ साली झी नाट्यगौरव चा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र राज्य शासन अभ्यासक नाट्यमहोत्सव
(सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक)
- मुंबई मराठी साहित्य संघ
(उत्कृष्ट लेखक)
- चतुरंग सवाई लेखक
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद
(सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक)
अखेर
संपादनत्यांनी शेवटचे पुस्तक हे आपले आत्मचरित्र लिहिले. मु.पो.वडाचे म्हसवे ते युएसए .
त्यांनी आपल्या वयाची ७० वर्षे पूर्ण केली. शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. [१]
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४