आदी शामिर (हिब्रू: עדי שמיר; जन्म ६ जुलै ) हा एक इस्रायली क्रिप्टोग्राफर आहे . तो आर.एस.ए. (रीवेस्त शामिर एडलमन) ह्या प्रसिद्ध संगणकीय माहिती गुपित करणाऱ्या आल्गोरिदमच्या जनकांपैकी एक आहे. त्याचबरोबर टो फीज-फियाट- शामिर ओळख अल्गोरिदम व डिफरन्शियल क्रिप्टॅनालिसिसचा सुद्धा जनक आहे व संगणकीय विज्ञान व क्रिप्टोग्राफी ह्या संगणकीय महिती गुपित ठेवण्यानाच्या शास्त्रामध्ये मोठे योगदान केले आहे.

आदी शामिर
निवासस्थान इस्रायेल
प्रशिक्षण तेल अवीव महाविद्यालय, वाईझमन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स
डॉक्टरेटचे मार्गदर्शक झोहर मन्ना
डॉक्टरेटकरता विद्यार्थी एली बिहाम, उरीएल फीज, अमोस फियाट
ख्याती आर. एस. ए. फीज-फियाट- शामिर आल्गोरिदम

डिफरन्शियल क्रिप्टॅनालिसिस

शिक्षण संपादन

शामिरचा जन्म तेल अवीव मध्ये झाला व तिथेच त्याने १९७३ साली तेल अवीव विद्यापीठामधून गणितामध्ये पदवी घेतली . त्याने आपले स्नातकोत्तर व डॉक्टरेट संगणकीय विज्ञानामध्ये वाईझमन संस्थेमधून १९७५ व १९७७ साली केले. त्याच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक होते "Fixed Points of Recursive Programs and their Relation in Differential Agard Calculus". नंतर एक वर्ष वार्विक महाविद्यालयामध्ये पोस्टडॉक्टरेट केल्यावर त्याने १९७७ - १९८० एम. आई. टी. येथे संशोधन केले. नंतर तो गणित व संगणकीय विज्ञान शाखेचा सदस्य म्हणून वाईझमन येथे परतला. २००६ मध्ये त्याने पारीसच्या इकोल नोर्माल सुपिउर येथे आमंत्रित रूपात शिकवायला सुरू केले.

संशोधन संपादन

आर. एस. ए. बरोबरच शामिर ने इतर अनेक योगदान क्रीप्तोग्रफी मध्ये केले. जसे 'शामिर सिक्रेट शेअरिंग', 'मेर्क्ल-हेल्मन नाप्सक' पद्धतीला तोडण्याचे उपाय, दर्शनीय क्रीप्तोग्रफी, त्वर्ल व ट्विंकल भागेदारी यंत्र, इत्यादी. एली बिहाम सोबत त्याने 'दिफ़्रन्शिअल क्रीप्टअनालिसिस' ही पद्धत तयार केली. पुढे चालून हे उघडास आले कि दिफ़्रन्शिअल क्रीप्टअनालिसिस हे नासा व आई. बी. एम. मध्ये पहिलेच विकासात झालेली असून ती गुपित ठेवण्यात आली होती.[१]

शामिरने क्रीप्तोग्रफी सोडून संगणक जगात इतरही योगदान केले. त्याने ' 2-satisfiability' साठीचा पहिला सरळ वेळेतील (लिनिअर ताईम) अल्गोरीदम बनवला. तसेच त्याने पीस्पेस व आई पी ह्या 'कोम्प्लेक्सिती क्लासेस' हे समतुल्य आहे ते दाखवले.[२]

शामिरणे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्तीफिशियल इंटेलीजंस)च्या सायबर सुरक्षा साठीच्या उपयुक्ततेवर शंका व्यक्त केल्या आहेत. आर. एस. ए. २०१७ च्या संमेलनात तो बोलला कि ए. आय. हे बचाव कार्यांसाठी उपयुक्त असून ते सुरक्षेच्या दृष्टीने घाला घालण्यात एवढे उपयुक्त नाही.[३]

ब्लोक्चेन ह्या नव्या चालना बद्दल सुद्धा शामिर ने संमेलनान मध्ये मत मांडली आहे. ब्लोक्चेन ह्याची अशी वापरण्याची परिस्थिती, शामिर म्हणतो, उघदास आलेली नाही ज्यामध्ये अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान उपयुक्त नाही.[४]

पुरस्कार संपादन

  • २००२ मध्ये रीवेस्त व एदलमन सोबत ट्युरिंग पुरस्कार,[५]
  • परीस कानेलाकीस सिद्धांत व प्रात्यक्षिक पुरस्कार,[६]
  • इस्रायेलच्या गणित मंडळाचा 'इर्दोस' पुरस्कार ,
  • १९८६ मध्ये आय. ट्रिपलइचा बेकर पुरस्कार [७]
  • यु. ए. पी. वैज्ञानिक बक्षीस
  • २००० मध्ये आय. ट्रिपलइ.चा कोजी कोबायाशी संगणक व दळणवळण पुरस्कार ,[८]
  • २००८चा 'द इस्रायेल प्राईझ',[९]
  • वाटरलू महाविद्यालयाकडून मानद डॉक्टर ऑफ माथ्स,[१०]
  • २०१७ जापान प्राईझ [११]

संदर्भ संपादन

  1. ^ [१] Archived 2007-06-15 at the Wayback Machine. : The Data encryption standards and its strengths against attacks
  2. ^ [२] : Siam Journal on computing
  3. ^ [३]: Cryptography experts cast doubt over AI's involvement in cyber security.
  4. ^ [४]: What blockchain isn't?
  5. ^ [५]: Archive : Alan Turing Award
  6. ^ [६] Archived 2009-04-06 at the Wayback Machine. : Paris Kanelakis award
  7. ^ "IEEE W.R.G. Baker Prize Paper Award Recipients" (PDF). IEEE. Archived from the original (PDF) on 2011-06-29. फेब्रुवारी 5, 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)IEEE WRG Baker award recipients"IEEE W.R.G. Baker Prize Paper Award Recipients" (PDF). IEEE. Archived from the original (PDF) on 2011-04-25. फेब्रुवारी 5, 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  8. ^ [७]: IEEE Kobi Kobayashi Computers and communications award recipients
  9. ^ [८]: The Israel prize
  10. ^ [९]: Presentation of honorary degrees at the fall of 2009 convocation
  11. ^ [१०]: Israeli scientist wins Japan Prize

बाह्य दुवा संपादन