आदर्की
आदर्की हे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील एक लहान गाव आहे. आदर्कीचे आदर्की बुद्रुक व आदर्की खुर्द असे दोन भाग आहेत. आदर्की खुर्द हे डोंगराळ भागात वसलेले असून त्याला नवी आदर्की किंवा वरची आदर्की असे म्हणतात. आदर्की खुर्द येथे आदर्की रेल्वे स्थानक आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील काही गाड्या येथे थांबतात. आदर्की खुर्द हे दूरवर विखुरलेल्या वाडया, वस्त्यांचे गाव आहे. येथे निष्णाईदेवी हे जागृत देवस्थान आहे.
आदर्की बुद्रुक येथे आठवडे बाजार भरत असल्याने येथे पंचक्रोशीतील स्थानिकांची वर्दळ असते. आदर्की बुद्रुकला जुनी आदर्की किंवा खालची आदर्की असेही म्हणतात. या आदर्कीमधून सातारा-फलटण हा प्रमुख जिल्हा रस्ता जातो. भैरवनाथ हे खालच्या आदर्कीचे ग्रामदैवत आहे. सातारा-निरा रस्त्यावरील आदर्की फाट्यावरून आदर्कीला पोहोचता येते. हा रस्ता पुढे फलटणला जातो..