आचेगाव
आचेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे.
?आचेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देगलूर |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पार्श्वभूमी
संपादननांदेड जिल्यातील देगलूर तालुक्यात लेंडी नदीच्या तीरावर आचेगाव हे गाव वसलेले आहे.
देगलूरच्या पश्चिम दिशेला आचेगाव आहे.
गावामध्ये पश्चिम दिशेला एक पाण्याची टाकी आहे.
आचेगावची लोकसंख्या 1100 आहे. मतदान 800 आहे.
पश्चिम दिशेला गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे .
येथे 4 थी पर्यंत शिक्षण दिले जाते. विद्यार्थी संख्या 35 आहे.
लेंडी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे.
उत्तर दिशेला गावामध्ये ग्रामपंचायत आहे यात 7 सदस्याचा समावेश आहे.
गावामध्ये एकूण 350 घरे आहे येथील लोकसंख्या 1100 व मतदार संख्या 800 आहे.
गावामध्ये एकूण शेती 600 एकर आहे.
शेती मध्ये रब्बी आणि खरीब पिके घेतात.
येथील जमीन कोरडवाहू आहे.
येथे टाळकी, कापूस, मूग, उडीद, तूर,
मिरची ही पिके घेतली जातात.
गावामध्ये दोन सार्वजनिक बोर आहेत.
पूर्व दिशेला महादेवाचे व मारोती मंदिर आहे.
या गावांमध्ये लिंगायत,धनगर,मराठा,मुस्लिम,मातंग,गोसावी,जंगम,हरिजन या जातीचे लोक येथे राहतात.
31/10/1986ला महापूर आला होता व दुसऱ्या गावाची निर्मिती झाली.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादननैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.