आचारसंहिता

एखाद्या व्यक्ती, पक्ष किंवा संस्थेसाठी योग्य पद्धतींच्या जबाबदार्या दर्शविणारे नियमांचा संच

आचारसंहिता ही व्यक्ति, पक्ष, संस्था यांनी सामाजिक स्तरावर पाळावयाच्या योग्य प्रमाणकांचा/मानकांचा, नियमांचा व जबाबदाऱ्यांचा एक संच असतो. या संकल्पनेत नीती, मानसन्मान व नैतिक अथवा धार्मिक संकेतांचा समावेश असू शकतो. इ.स. २००७ मध्ये खालील प्रकारे याची व्याख्या केल्या गेली:

तत्त्वे, मूल्ये,मानके किंवा वागण्याचे नियम जे एखाद्या संस्थेला निर्णय घेण्यास,एखाद्या पद्धतीला व प्रणालीला खालील मार्गांनी मार्गदर्शन करतात:

(अ) त्या संस्थेच्या कळीच्या भागधारकांचे कल्याणात योगदान करतात

(ब) त्याच्या लागू करण्याने बाधित, सर्व घटकांचे अधिकारांचा योग्य तो मान राखल्या जातो.

एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण आचारसंहिता लिहिल्या जाते, जी त्या कंपनीचा व्यवसाय वाढविते. त्या आचारसंहितेद्वारे, कंपनी त्यांचे कर्मचाऱ्यांना आपल्या अपेक्षा अप्रत्यक्षपणे कळविते. एखाद्या छोट्यातील छोट्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे असणाऱ्या अपेक्षांचा दस्तावेज तयार करणे ही आदर्श पद्धत आहे. हा दस्तावेज फारच कठिण अथवा किचकट नको किंवा त्यात भरमसाठ अपेक्षा नकोत. तो सरळसोट व साधा असावा.

आचरणात संपादन

एखाद्या कंपनीच्या आचारसंहितेचे पालन करतांना कर्मचाऱ्यांना सहजभाव वाटला पाहिजे. योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत/व्यक्तिंपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास त्यांना संकोच वाटावयास नको. त्यांची अशीही व्हावयास हवी कि संस्था त्यावर योग्य कार्यवाही करेल.

उदाहरणे संपादन