आकाश हा ॲन्ड्रॉइड प्रणालीवर चालणारा एक टॅबलेट संगणक आहे. डेटाविंड ह्या मॉंत्रियाल-स्थित कंपनीने ह्याचे डिझाईन तयार केले असून त्याचे उप्तादन भारतात केले जाईल. ह्या टॅबलेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राउझिंगसाठी करता येईल. अंदाजे ६० अमेरिकन डॉलर किंमत असलेला व यूबीस्लेट ७ ह्या नावाने विकला जाणारा आकाश हा सर्व आधुनिक सुविधा असणारा जगातील सर्वांत स्वस्त टॅबलेट असेल. ह्या टॅबलेटचा उपयोग भारतभरातील २५,०००कॉलेजे व ४०० विद्यापीठे इ-शिक्षणासाठी करतील असा अंदाज केला गेला आहे. भारत सरकारने अंदाजे १ लाख आकाश टॅबलेट उपकरणे खरेदी केल्याचे वृत्त आहे.

हार्डवेर

संपादन
  • ७ इंच टचस्क्रिन
  • दणकट बांधणी
  • वायरलेस इंटरनेट
  • हेडफोन जॅक
  • २ युएसबी पोर्टस
  • एआरएम आर्किटेक्चर प्रोसेसर
  • २५६ एमबी मेमरी

सॉफ्टवेर

संपादन
  • ॲन्ड्रॉइड २.२
  • आयआयटीने विकसित केलेली शैक्षणिक सॉफ्टवेर

शब्दोतिहास

संपादन

ह्या टॅबलेट ला आकश हे नाव देन्या पूर्वी साक्शात हे नाव दिले गेले होते.आकश हे नाव सन्स्क्रुत शब्द ' आकाशा ' ह्या वरून घेतले गेले असुन ह्या शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत जसे की नभ,गगन.

विनिर्देश

संपादन
विनिर्देश आकाश यूबीस्लेट 7+
किंमत  २,५००  २,९९९
मध्यवर्ती प्रक्रियन विभाग गती ARM11, 366 MHz ARM कोर्टेक्स-A8, 700 MHz
रॅम २५६ एमबी २५६ एमबी[]
बाट्री 2100 mAh 3200 mAh
ओपेरेटींग सिस्टीम ॲन्ड्रॉइड 2.2 फ्रोयो ॲन्ड्रॉइड 2.3 जिंजर्ब्रेड
नेटवर्क Wi-Fi Wi-Fi, GPRS फोन नेटवर्क
निर्माणाचे ठिकाण भारत भारत

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "Aakash Tablet: UbiSlate Netbook: Datawind Ubislate". UbiSlate. Datawind.com. 2011-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-01-11 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन