आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण संघटना
आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण संघटना (इंग्रजी : International Hydrographic Organization, फ्रेंच : Organisation hydrographique internationale)जलमापचित्रणासाठी एक आंतरसरकारी सल्लागार आणि तांत्रिक संस्था आहे, जी १९२१ मध्ये आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण विभाग ( ब्युरो हायड्रोग्राफिक आंतरराष्ट्रीय ) म्हणून स्थापित झाले होते. ३ मे, १९६७ रोजी मोनॅको मध्ये झालेल्या करारानंतर, या संगठनेचे आत्ताचे ९९७० पासून आत्ताचे नाव स्वीकारले गेले. [१]
International Hydrographic Organization | |
Organisation hydrographique internationale | |
संकेतस्थळ | IHO.int |
---|
सदस्य देश
निलंबित सदस्य
सदस्यता मंजूर, पण सदस्यत्वाची वाट पहात आहे
अर्ज प्रगतीपथावर
उद्दिष्ट
संपादनही जल मापचित्रण सेवांचे समन्वय करणारी संस्था आहे जी संबंधित सरकारांनी अधिकृतपणे अधिस्वीकृत केली आहे. या संघटनेची उद्दीष्टे आहेत:
- राष्ट्रीय जलमापचित्रण कार्यालयांच्या कार्याचे समन्वय करणे.
- सर्वसाधारणपणे नाविक आणि नकाशाशास्त्र प्रकाशनांचे मानकीकरण साध्य करणे.
- जलमापचित्रणाच्या विकासासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करणे.
- जलमापचित्रणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या विकासास आणि भौतिक समुद्रशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या तंत्रांना प्रोत्साहन देणे
नकाशाशास्त्रीय वैशिष्ट्य
संपादन- फ्रेम्स, अंशशोधन , रेटिकल आणि आलेखी मापनश्रेणी .
संदर्भ
संपादन- ^ "About the IHO | IHO". iho.int. 2021-04-23 रोजी पाहिले.