ॲबोटाबाद
(अॅबोटाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲबोटाबाद पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील शहर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे १४ लाख आहे. या शहराची स्थापना १८५३मध्ये झाली. यास ब्रिटिश सैन्याधिकारी मेजर जेम्स ॲबोटचे नाव दिलेले आहे.
हे शहर समुद्रसपाटीपासून १,२५६ मी (४,१२१ फूट) उंचीवर असून पाकिस्तानमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
पाकिस्तान मिलिटरी अकादमी या शहरात आहे.
२ मे, २०११ रोजी अमेरिकेच्या सैनिकांनी या शहरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनची हत्या केली.