अहिल्या रांगणेकर
अहिल्या रांगणेकर (इ.स. १९२२; पुणे - इ.स. २००९; मुंबई) या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.
अहिल्याबाईंचा विवाह १९४५ साली साम्यवादी चळवळीतले त्यांचे सहयोगी पी.बी. रांगणेकरांशी झाला होता.[१]
१९७५ साली आणीबाणीच्या काळात मृणाल गोऱ्यांच्या साथीने महागाई विरोधात आंदोलन छेडल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. भारत-चीन युद्धकाळात त्यासुद्धा इतर साम्यवादी नेत्यांप्रमाणे नजरकैदेत होत्या.
राजकीय कारकीर्द
संपादन- १९४३ सालापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या, १९७५ सालापासून केंद्रीय समिती सभासद, व १९८३ ते १९८६ पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश चिटणीस.
- १९७७ ते १९८० या कालावधीसाठी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवड.[२]
- १९६१ ते १९८० मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका[३].
- १९७९ साली इंडियन ट्रेड युनियन या उपाध्यक्ष.
इतर ठळक नोंदी
संपादन- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग.
- परळ महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा.
- आणीबाणी काळांत अटक झालेल्या पहिल्या महिला आंदोलनकर्त्या.
संदर्भ
संपादन- ^ "सी.पी.आय.एम. चे संकेतस्थळ". 2009-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले.
- ^ "CPI(M) pays homage to Ahilya Rangnekar". April 20, 2009. 2012-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले.
- ^ "The Pioneers: Ahilya Rangnekar". May 24-June 6, 2008. 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |