असंतत उपवास
असंतत उपवास म्हणजेच अधूनमधून उपवास करणे. यालाच इंग्रजीत Intermittent fasting (इंटरमिटेंट फास्टिंग) असे म्हणले जाते. यामधे काही काळ निरंक उपवास केला जातो तर काही काळ नियमित अन्न सेवन केले जाते.
या आहार पद्धतीत उष्मांक मूल्य किंवा तत्सम मूल्ये यावर भर न देता, ठराविक काळ पौष्टिक आहार आणि ठराविक काळ संपूर्ण उपवास यावर भर दिला जातो.
विविध प्रकार
संपादनअसंतत उपवास किंवा अधूनमधून उपवास करण्याचे सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजेः
१६/८ पद्धतः
संपादनया आहार पद्धतीत सकाळचा नाश्ता वर्ज केला जातो. त्यानंतर दिवसभरातून ठराविक आठ तासात आहार घेतला जातो आणि उर्वरित सोळा तास उपवास केला जातो.
उदाहरणार्थ - जर सकाळी ११ वाजता पहिला आहार घेतला तर रात्रीचा आहार ७ वाजेच्या आत घेतला जातो. तद्नंतर रात्री ७ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत कडक उपवास करतात. या सोळा तासात पाण्याव्यतिरीक्त कुठेलेही द्रव्य पदार्थ सुद्धा वर्ज्य असतात.
खाणे - विश्रांती - खाणे पद्धत
संपादनया पद्धतीत एका आठवड्यातील कोणतेही एक किंवा दोन दिवस (२४ तास) काहीही न खाता उपवास करावयाचा असतो. यात सलग दोन २ दिवस उपवास करावयाचा नसतो. थोडक्यात एका आठवड्यातील दोन उपवासात १ किंवा २ दिवसाचे अंतर ठेवावयाचे असते.
५ : २ आहार पद्धत
संपादनयात आठवड्यातील कोणतेही सलग नसलेले दोन दिवस फक्त ५०० ते ६०० कॅलरी उर्जा असलेला आहार घ्यायचा असतो. उर्वरित पाच दिवस आपण आहरात इतर सर्व काही खाउ पिऊ शकतो.
वॉरियर डाएट
संपादनया आहार पद्धतीत दिवसभरात ठराविक वेळा आणि मोजक्या प्रमाणात न शिजवलेले फळे आणि भाजीपाला; जो की सहज आणि सुपाच्च असतो खायचे असतात. तद्नंतर रात्री फक्त एकदा पोटभर जेवायचे असते.
हे कसे कार्य करते
संपादनअसंतत उपवास किंवा अधूनमधून उपवास हा मुख्यतः वजन कमी करण्यासाठीचा तुलनात्मक दृष्टीने सहज सोपा उपाय आहे. या पद्धतीत सहसा ग्रहण करण्यात येणाऱ्या अन्नाची कॅलरी मोजण्याची किंवा आहारात काय खावे, काय नाही यावर फारसा भर दिला जात नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठीचा उपवास करण्याची ही सर्वमान्य आणि सहजसुलभ पद्धती आहे.
कमी कॅलरीयुक्त इतर आहाराच्या तुलनेत या आहाराने शरीरातील स्नायुंचा ऱ्हास (muscle loss) कमी प्रमाणात होतो, तसेच हा आहार अल्पावधीत आपल्या चयापचय दरात ३.६% ते १४% इतकी वाढ करु शकतो.
इतर फायदे: अधूनमधून उपवास केल्याने शरीरातील सुज, कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तातील ट्रायग्लिसेराइड्स आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
शिवाय, नियमितपणे उपवास केल्याने human growth hormone (HGH) ची पातळी वाढते व इंसुलिनची संवेदनशीलता वाढने, पेशी दुरुस्ती प्रक्रिया देखिल वाढते.
दुष्परिणाम
संपादनअसंतत उपवास किंवा अधूनमधून उपवास करणे ही वजन कमी करण्याची किंवा वजन नियंत्रणात ठेवण्याची एक सहज, सोपी आणि निरोगी लोकांसाठी एक सुरक्षित पद्धती आहे. असे असले तरी पण ही आहार पद्धती सर्वांना अनुकूल नाही. कारण, अभ्यासाअंती काही प्रकरणात असे अढळुन आले आहे की ही आहार पद्धती स्त्रियांसाठी फारशी उपयुक्त तथा सुरक्षित नाही जितकी पुरुषांसाठी आहे.
त्याच बरोबर, पुढील व्यक्तींनी असा उपवास करणे टाळावे –
- ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत असते,
- गर्भवती महिला,
- स्तनपान करणारी माता,
- किशोर, मुले आणि कुपोषित व्यक्ती
- वजन कमी असलेले तथा पौष्टिकतेची कमतरता असलेले लोक यांनी असा उपवास करणे टाळले पाहिजे.