मार्कंडेय पुराणात आठ सिद्धींचे वर्णन आहे. कठोर उपासनेमुळे व विशिष्ट प्रकारच्या आचरणाने त्या प्राप्त होतात असा समज आहे. हनुमानाने गरिमा सिद्धी वापरून आपले शरीर मोठे केले व लंकेकडे उड्डाण केले असा समज आहे.[ संदर्भ हवा ]

अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा।
प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धयः॥

अणिमा,महिमा,लघिमा,गरिमा,प्राप्ति,प्राकाम्य,ईशित्व वशित्वं या आठ सिद्धी आहेत. या आठ सिद्धीवर चर्चा करण्याआधी आपण सिद्धी म्हणजे काय ते पाहू‐ सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ति,स फलता इ. 'सिद्धी' हा शब्द मार्कंडेय पुराणात, महाभारतात मिळतो. पंचतंत्रामध्ये असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित करण्यास सिद्धी असे म्हटले गेले आहे.मनुस्मृतीमध्ये या शब्दाचा प्रयोग 'ऋणमुक्ती' या साठी केला आहे. सांख्यकारिका, तत्वसमास, तांत्रिक बौद्धसम्प्रदाय यामध्ये या शब्दाचा अर्थ विशिष्ट पद्धतीने दाखविला आहे- 'चमत्कारिक साधनाद्वारा अलौकिक शक्तींचे अर्जन म्हणजे सिद्धी.'उदाहरणादाखल पहावयाचे झाल्यास दिव्यदृष्टी,एकाच वेळेस दोन जागी असणे,आपल्या आकारास सूक्ष्म अथवा मोठे करणे इ. हिन्दु धर्मात आठ सिद्धीवर विश्लेषण आढळून येते. पातंजल योगशास्त्रात -

'जन्म औषधि मन्त्र तपः समाधिजाः सिद्धयः ।'

असे म्हटले आहे. अर्थात, जन्माने, औषधिद्वारा, मन्त्राद्वारा, तपाने आणि समाधीचे सिद्धींची प्राप्ती केली जाते.

आठ प्रकारच्या सिद्धीसंपादन करा

  1. अणिमा - ज्या मुळे साधक अणूइतका सूक्ष्म होऊन कुणासही दृष्टीस पडत नाही आणि यामुळे तो कठिणातल्या कठीण पदार्थातही प्रवेश करू शकतो.अर्थात 'Anima is the ability to become smaller than than the smallest, reducing one's body to the size of an atom or even become invisible. ही सिद्धी हनुमानजी सोबत जोडली जाते. हनुमानाला मध्ये आले आहे‐'अष्टसिद्धी नवनिधी के दाता,असवर संग जानकी माता।'
  2. महिमा - महिमा सिद्धी ही अणिमा सिद्धीच्या एकदम विरुद्ध आहे. साधक आपल्या शरीरास असीमित विशालकाय करण्यास समर्थ असणे, हे या सिद्धीच्या कक्षेत येत.
  3. गरिमा - शरीरास वजनदार,भारी बनविण्याची दलता कला,क्षमता म्हणजेच गरिमा सिद्धी.आपण महाभारतात संदर्भ वाचतो की,श्रीकृष्णाची तुला करताना सर्व काही दुसऱ्या पारड्यात टाकल गेल तरीही श्रीकृष्णाचंच पारड जड.अर्थात त्यांच्या शरीरास त्यांनी भारी,वजनदार बनवल होत.ज्यामुळे त्यांच पारड जड झाल होत.यात,महिमा सिद्धीसारखा शरीरास विशालकाय करायचे नाही तर त्याच शरीराचा आकार न बदलता वजन वाढवायचे असते.जेणेकरून कुणीही त्याचे शरीर हलवू शकणार नाही.भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमंतांनी कदाचित याच सिद्धीचा प्रयोग केला असावा.(महाभारत)
  4. लघिमा -शरीरास भार रहित करण्याची क्षमता असणे म्हणजे लघिमा.शरीर,मन,बुद्धी,वाणी आणि इंद्रिय यामध्ये लाघवता आणणे हे या सिद्धीमध्ये येत.
  5. प्राप्ती - साधक हा कुठेही गमन करू शकणे,हे या सिद्धीमध्ये येत.शरीराच्या गतीपेक्षा मनाची गती ही इथे वर्धित झालेली असते.आपल्या इच्छेनुसार अदृश्य होऊन साधक हा गमन करू शकतो.
  6. प्राकाम्य-दुसऱ्याच्या मन, मत आणि विचार यांना समजून घेणे हे असे या सिद्धीचे लक्षण होय. जेव्हा दुसऱ्याच्या मनात मनातील एखाद्या गोष्टीस अत्यंत सरलता पूर्वक साधक समजू शकतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस कारणच उरत नाही आणि तिथे मनोसंवादास प्रारंभ होतो.
  7. इशित्व-ही उपाधी भगवंताची आहे. साधक हा स्वतः ईश स्वरूप होतो. असे म्हणतात ना,'नर अपनी करणी करे तो नर का नारायण हो जाये' अगदी तसे हा साधक या सिद्धी कारणाने भगवत्स्वरूपच होतो, तल्लीन होतो.
  8. वशित्व-कोणासही वश करून घेणे हे या सिद्धी चे कार्य एखाद्या करवी विधायक कार्य करण्याच्या योगे ही सिद्धी कामी येते.

संदर्भसंपादन करा