अष्टविनायक मंदिर (लातूर)
श्री अष्टविनायक मंदिर, लातूर हे लातूर मधील शिवाजीनगर भागात असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराची स्थापना १९८९ मद्धे झाली. गणेश मंदिरासोबतच येथे अष्टविनायकाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूंनी बागा असुन, समोर कारंजे आहेत. मंदिराच्या समोरच ८ ते ९ फुट उंच शंकराची मूर्ती आहे. तसेच येथे नवग्रह, मारुती, विठ्ठल, शेषनाग, देवी सरस्वती यांच्या देखील मूर्ती आढळतात.