अविनाश-विश्वजीत ही मराठी चित्रपट संगीतकार 'अविनाश चंद्रचूड' आणि 'विश्वजीत जोशी' यांची जोडी आहे. त्यांनी सांगतो ऐका, पोपट, प्रेमाची गोष्ट, बदाम राणी गुलाम चोर, मुंबई-पुणे-मुंबई सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. अविनाश-विश्वजीत हे त्यांचे व्यावसायिक नाव असून त्यांच्या संगीत चित्रफिती आणि डीव्हीडीच्या मुखपृष्ठावर दिसते. संगीत दिग्दर्शनासोबतच विश्वजीत जोशी हे गीतकार देखील आहेत.

प्रारंभिक जीवनसंपादन करा

अविनाश विश्वजित यांनी इस २००७ मध्ये त्यांच्या संगीतकाराच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले.

अविनाश-विश्वजीत संगीत सूचीसंपादन करा

वर्ष चित्रपट नोट्स
2007 तुला शिकविण चांगलाच धडा पार्श्व संगीत
2008 ऑक्सिजन (चित्रपट) पार्श्व संगीत
2008 आईचा गोंधळ पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शक
2008 सनई चौघडे पार्श्व संगीत
2010 मुंबई-पुणे-मुंबई संगीत दिग्दर्शक
2011 प्रतिबिंब पार्श्व संगीत
2012 ब्लफमास्टर पार्श्व संगीत
2012 लौ का लाथ पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शक
2012 धागेदोरे पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शक
2012 भारतीय पार्श्व संगीत
2012 बदाम राणी गुलाम चोर संगीत दिग्दर्शक
2012 संभा - आजचा छावा संगीत दिग्दर्शक
2013 प्रेमाची गोष्ट पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शक
2013 धटिंग धिंगाणा पार्श्व संगीत
2013 पोपट संगीत दिग्दर्शक
2014 सांगतो ऐका…! संगीत दिग्दर्शक
2014 आंधळी कोशिंबीर पार्श्वसंगीत आणि संगीत दिग्दर्शक
2014 कॅपुचीनो संगीत दिग्दर्शक
2014 गुरुपौर्णिमा संगीत दिग्दर्शक
2014 क्लासमेट्स संगीत दिग्दर्शक (सामायिक)
2014 इश्क वाला लव्ह संगीत दिग्दर्शक (सामायिक)
2015 मुंबई-पुणे-मुंबई २ संगीत दिग्दर्शक
2015 ७ रोशन व्हिला संगीत दिग्दर्शक
2016 ती साध्या काय करते संगीत दिग्दर्शक (सामायिक)
2017 कंडिशन्स अँप्लाय संगीत दिग्दर्शक

संदर्भसंपादन करा