अवंती
अवंती हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
संपादनपश्चिम मध्य भारतातील गुजरात, राजस्थान व माळव्याच्या प्रदेशात अवंतीचे विशाल राज्य होते. उज्जयिनी ही याची राजधानी होती.
राजे व राज्यकर्ते
संपादनचंडप्रद्योत किंवा महासेनप्रद्योत हा राजा या राज्यात होऊन गेला. त्याने वत्स राज्यातील वत्सराजा उदयनला आपली कन्या देऊन त्याच्याशी संबंध जोडलेले होते. तसेच शूरसेन राज्याच्या सुबाहूसही आपली कन्या देऊन त्याच्याशीही मैत्रीचे संबंध जोडले होते. चंडप्रद्योताच्या कारकीर्दीत अवंतीचा राज्यविस्तार होऊन विशाल राज्याची निर्मिती झाली होती.
संकिर्ण
संपादनअवंतीच्या राज्यात बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता. भासाच्या नाटकातून आणि बौद्ध ग्रंथांमधून चंडप्रद्योत आणि अवंती राज्याची विस्तृत माहिती मिळते.