अल्तेपेत्ल

(अल्टेपेट्ल या पानावरून पुनर्निर्देशित)

अल्तेपेत्ल हे कोलंबस-पूर्व आणि स्पॅनिश विजय-काळातील अ‍ॅझ्टेक समाजातील स्थानिक, वांशिक-जमाती वर आधारलेली राजकीय संस्था होती. ह्याची तुलना आपल्याकडील नगरराज्यांची करता येईल, परंतु व्याख्या आणि व्यवस्थेनुसार दोन्ही भिन्न ठरतात. हा शब्द अ-त्ल (ā-tl) - जल - आणि तेपे-त्ल (tepē-tl) - डोंगर ह्या दोन नाहुआतल शब्दांपासून तयार झाला आहे.

नाहुआतल विद्वान लिसा सौसा, स्टॅफॉर्ड पूल आणि जेम्स लॉकहार्ट नी म्हटले आहे:

नाहुआ व्याकरण पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील किंवा एखाद्या जागेतील लोकांची संपूर्णतेची कल्पना अल्तेपेतल ह्या एककांच्या संग्रहातून करणे आणि त्या संज्ञेमध्ये बोलणे होय[१]

ते तज्ञ इंग्लिश भाषेतील अंदाजे-तौलनिक शब्द वापरण्याऐवजी नाहुआतल संज्ञा वापरणे अधिक पसंत करतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, व्हर्जिन ऑफ ग्वादालुपेच्या संबंधित बऱ्याच कागदपत्रांतून स्पॅनिश शब्द चिवादाद दे मेहिको (मेक्सिको सिटी) च्या भाषांतरात अल्तेपेतल हा शब्द वारंवार वापरला जातो आणि हे भाषांतरित मजकूर रंगीत असून ते नाहुआ समाजव्यवस्थेबद्दल माहिती सांगते.

ह्या कल्पनांची तुलना मायांच्या काह आणि मिक्स्तेकांच्या नू ची करता येईल.

संदर्भ

संपादन
  1. ^ Sousa et al. 1998, p.36
García Martínez, Bernardo. "Community Kingdoms: Central Mexico (Nahua)". In David Carrasco (ed.) (ed.). The Oxford Encyclopedia of Mesoamerican Cultures: The Civilizations of Mexico and Central America. vol. 1. Oxford: Oxford University Press. pp. 238–239. ISBN 0-19-510815-9. OCLC 44019111.CS1 maint: extra text: editors list (link)
Gibson, Charles. The Aztecs Under Spanish Rule: A History of the Indians of the Valley of Mexico, 1519–1810. Stanford, CA: Stanford University Press. ISBN 0-8047-0912-2. OCLC 9359010.
Lockhart, James. The Nahuas After the Conquest: A Social and Cultural History of the Indians of Central Mexico, Sixteenth Through Eighteenth Centuries. Stanford, CA: Stanford University Press. ISBN 0-8047-2317-6. OCLC 24283718.
Noguez, Xavier. "Altepetl". In David Carrasco (ed.) (ed.). The Oxford Encyclopedia of Mesoamerican Cultures: The Civilizations of Mexico and Central America. vol. 1. Oxford: Oxford University Press. pp. 12–13. ISBN 0-19-510815-9. OCLC 44019111.CS1 maint: extra text: editors list (link)
Sousa, Lisa. The Story of Guadalupe: Luis Laso de la Vega's Huei tlamahuiçoltica of 1649. UCLA Latin American studies, vol. 84; Nahuatl studies series, no. 5. Stanford & Los Angeles, CA: Stanford University Press, UCLA Latin American Center Publications. ISBN 0-8047-3482-8. OCLC 39455844. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)

हे सुद्धा पहा

संपादन