अल्क धातू
अल्क धातू[१] (अन्य नामभेद: अल्कली धातू ; इंग्लिश: Alkali metal , अल्कली मेटल ;) हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या गटातील मूलद्रव्येही एकमेकांसारखे गुणधर्म दाखवतात.
या गटातील धातू खालीलप्रमाणे व वाढत्या अणुभाराप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांत होणारा बदल खालील तत्क्यात दाखवला आहे :
Z | मूलद्रव्य | इलेक्ट्रॉन रचना |
---|---|---|
१ | हायड्रोजन | १ |
३ | लिथियम | २,१ |
११ | सोडियम | २,८,१ |
१९ | पोटॅशियम | २,८,८,१ |
३७ | रुबिडियम | २,८,१८,८,१ |
५५ | सीझियम | २,८,१८,१८,८,१ |
८७ | फ्रान्सियम | २,८,१८,३२,१८,८,१ |
अल्कली धातू वाढत्या अणुक्रमांकाप्रमाणे गुणधर्मात बदल दाखवतात. उदाहरणार्थ, त्यांची विद्युतऋणता कमी होत जाते; विक्रियाशीलता वाढत जाते; विलयबिंदू व उकळणबिंदू वाढत जातो; घनता वाढत जाते. पोटॅशियम व फ्रांसियम हे धातू याला अपवाद आहेत; त्यांची घनता अनुक्रमे सोडियम व सीशियम यांपेक्षा कमी असते.
अल्क धातू | अणुभार | विलयबिंदू (के) | उकळणबिंदू (के) | घनता (ग्रा·सेंमी−३) | विद्युतऋणता (पॉलिंग) |
---|---|---|---|---|---|
लिथियम | ६.९४१ | ४५३ | १६१५ | ०.५३४ | ०.९८ |
सोडियम | २२.९९० | ३७० | ११५६ | ०.९६८ | ०.९३ |
पोटॅशियम | ३९.०९८ | ३३६ | १०३२ | ०.८९ | ०.८२ |
रुबिडियम | ८५.४६८ | ३१२ | ९६१ | १.५३२ | ०.८२ |
सीझियम | १३२.९०५ | ३०१ | ९४४ | १.९३ | ०.७९ |
फ्रान्सियम | (२२३) | २९५ | ९५० | १.८७ | ०.७० |
संदर्भ
संपादन- ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १०.
बाह्य दुवे
संपादन- "ग्रुप १: द अल्कली मेटल्स ("गट १: अल्क धातू")" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "गट १ मूलद्रव्यांचे आण्विक व भौतिक गुणधर्म" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |