अलीला दिवा, गोवा येथील हे हॉटेल एक आदर्श असे विश्रांतीचे ठिकाण की जे आधुनिक परिपूर्ण सुविधांनी युक्त असे आरामदायक हॉटेल आहे.[१] त्याला पूर्व कालीन शब्दाने संबोधावयाचे झाले तर जगातील आश्चर्य असेही म्हणता येईल.

ठिकाण संपादन

हे हॉटेल दक्षिण गोवा येथील माजोरदातिल गोंसूया बीच जवळील हिरव्यागार भाताच्या रोपवाटिका जवळ आहे. हे हॉटेल दक्षिण गोवा मध्ये आरोस्सीम व कळवा बीच पासून साधारण २ किमी. आणि माजोरदा बीच पासून साधारण 1 किमी. तसेच पालोळेम बीच पासून ४५ किमी.,पंजीम शहरापासून ३२ किमी. अंतरावर आहे. वर्का बीच १३ किमी, बेतलबतीम बीच २ किमी. आणि उत्तर गोवा मध्ये कळङ्गुते बीच ४५ कि॰मी.,आहे. या हॉटेल जवळील ही आकर्षणे आहेत, शिवाय डबोलीम विमानतळ साधारण २५ कि.मी.,मडगाव रेल्वे स्थानक साधारण १७ कि.मी. प्रकाश बस स्टॅंड साधारण ७०० मी. अंतरावर आहेत.

वैशिष्ट्य संपादन

या हॉटेलमध्ये पोहण्याचा तलाव,स्पा,ग्रंथालय, मुलांसाठी घसरगुंडी,सिनेमा हॉल, खेळणी, यांचा स्वतंत्र विभाग, १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी वेगळा सुविधा भाग, तीन रेस्टोरंट, बार,आलीला लिविंग बुटीक,व्यवसाय केंद्र या सुविधा आहेत.[२] या हॉटेल मध्ये भारतीय आणि परदेशीय चमचमीत अगदी तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ बनविणारी स्वयंपाक व्यवस्था येथील स्वयपांक कक्षात आहे. येथे मारवाडी प्लेठोरा, जैन व गुजराती पद्दतीची मिष्टान्ने शुद्द शाकाहारी किचन मध्ये बनविली जातात. तलावाच्या काठावरील एज बार मध्ये विविध प्रकारची देशी आणि परदेशी उच्च प्रतीची ड्रिंक्स(मदिरा) उपलब्ध आहेत. स्पाइस स्टुडिओत केळीच्या बागेतील सुंदर रीतीने बनविलेल्या उंच कठड्यावरील लाजवाब भोजन भरपूर समाधान देते. विवो मध्ये तेथील वातानुकूलित व खुल्या वातावरणातील भोजन कक्षात तेथील किचन मधील पदार्थ तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही इतके चवीष्ट असतात. सभा जागेत भव्य सभाग्रह, बोर्ड रूम,मीटिंग रूम,आहेत तेथे ऑडिओ / विजुयल प्रेझेंटेशन उपकरणे, वायरलेस इंटरनेट कनेक्टीविटी उपलब्ध आहेत. येथे लग्न कार्ये व्यवस्था सुद्धा केली जाते. इतर सुविधामध्ये स्वास्थ्य केंद्र, मोफत वाय फाय, इंटरनेट पूर्ण रिसॉर्ट मध्ये आहेत.

खोली संपादन

या हॉटेल मध्ये ७ प्रकारच्या १५३ खोल्या आहेत. त्यात फॅमिली टेरेस रूम्स, स्टॅंडर्ड टेरेस रूम्स, लोफ्ट रूम्स,आलीला सूट, दिवा क्लब रूम्स, दिवा क्लब सूट, आणि दिवा क्लब २ बेडरूम सूट यांचा समावेश आहे. सर्व खोल्यांना बाल्कनी किंवा टेरेसची व्यवस्था आहे की तेथून अथीती समोरील देखावे सहजपणे नजरेत सामाऊ शकतील.

खोली सुविधा संपादन

वरील सर्व खोल्यातून सामान्यतः वातावरण खेळते राहील याची काळजी घेतलेली आहे. खोलीमध्ये वातानुकूलित यंत्र, एल सीडी टीव्ही, वायफाय, प्रशस्त स्नान ग्रह, आरामात झोपता येईल एवढी मोठी हौद(टब) आहेत. शिवाय साधारणपणे आवश्यक त्या बेसिक सुविधा आहेत त्याची जंत्री खालील प्रमाणे आहे.

दूरचित्रवाणी अपंग अथीतीसाठी सुविधा इंटरनेट / ब्रोड बॅंड
फ्लॅट स्क्रीन दूरचित्रवाणी इस्त्री हंगर्स
इन रूम मेनू मीनी बार इन रूम इलेक्ट्रोंनिक सेफ
लौंडरी ब्याग सामान ग्रह दूरध्वनी कनेक्षण
सॅटलाइट शॉवर सेफ
दूरचित्रवाणी चहा / कॉफी मेकर टेंपरेचर कंट्रोलर
सामान रॅक बेडसाइड कंट्रोल पाळणा घर
वेघिंग मसीन खाजगी स्नान ग्रह इस्त्रीचे मेज
लिखाण मेज / स्टडी टेबल दूरध्वनी आथिति स्लीपर्स
वूडण फ्लोअर स्टीम बाथ खरेदी केंद्र
वेक अप काल सेवा मशाज केंद्र सौंदर्य केंद्र
वाय फाय असेस सुल्कासह म्यूजिक सिस्टम हेयर ड्रायर
मिनरल वॉटर इंटर कॉम धोबी
स्वछताग्रह

इतर सुविधा संपादन

२४ तास स्वागत कक्ष, २४ तास सुरक्षा व्यवस्था, २४ तास रूम सेवा, प्रवाशी मार्गदर्शन टेबल, वाहनतळ, हमाल,वाहतूक सेवा, मोफत पिकअप व ड्रॉप. किड्स पूल,जिम, दारवान, लिफ्ट,प्रदूषण मुक्त रूम, हाऊस कीपिंग, या सुविधा आहेत.[३]

अवॉर्ड ( बक्षीस) संपादन

  • सन २०१० बेस्ट न्यू हॉटेल अवॉर्ड आणि कोंदे नास्ट ट्रव्हलर USA या हॉटेल ग्रुपचे यादीत समाविष्ट तसेच देसतीन एशियन लुकसे यादीत समाविष्ट.
  • सन २०११ HICSA क्रीटीक्स अवॉर्ड.[४]
  • सन २०१२ ट्रेण्डीएस्ट हॉटेल म्हणून ट्रीप अडव्हाइजर ट्रॅवलर चॉइस यांच्याकडून अवॉर्ड, टाइम्स फूड अवॉर्ड, दुसऱ्या वार्षिक भारत लिडंरशिप कोंकलेव्ह कडून आदरातीत्याचे उत्कृष्ट प्रकारचे संघ व्यवस्थापन अवॉर्ड.
  • सन २०१३ या हॉटेलचे रेस्टोरंट आणि बार यांना उत्कृष्ट अहाराचे आवार्ड मिळालेले आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ "अलीला हॉटेल्स एंड रिसॉर्ट्स लॉन्चेस इट्स फर्स्ट रिसोर्ट इन गोवा".[permanent dead link]
  2. ^ "अबाऊट हॉटेल अलीला दिवा गोवा".
  3. ^ "अलीला हॉटेल्स फॅसिलीटीज". Archived from the original on 2016-12-15. 2016-12-10 रोजी पाहिले.
  4. ^ "अलील दिवा गोवा हॅज बीन एककॉर्डेड द क्रिटिक्स अवार्ड फॉर द बेस्ट न्यू हॉटेल इन इंडिया".[permanent dead link]