अयनांश
राशिविभाग किंवा नक्षत्रविभाग यांचा आरंभ वसंतसंपातामध्ये मानल्यास त्यांस सायनराशी किंवा नक्षत्र म्हणतात. क्रांतिवृत्तावरील एखाद्या निश्चल बिंदूपासून त्यांचा आरंभ मानिल्यास त्यांस निरयनराशी किंवा नक्षत्र म्हणतात. निश्चलबिंदू आणि वसंतसंपात यामंधील अंतरास अयनांश म्हणतात. भारतीय ज्योतिषांत रेवती नक्षत्रांतील योगतारा (म्हणजे तिच्या लंबवृत्ताचे व क्रांतिवृत्ताचे छेदस्थल) आरंभी मानला असून सन १९२५ च्या आरंभीं अयनांश १८०० ४९’ ३६” 'इतके होते. असे असले तरी आरंभस्थान व अयनांश यांच्याबद्दल बराच मतभेद असून काही विद्वानांच्या मते चित्रा नक्षत्राच्या योगताऱ्यासमोरील बिंदू आरंभस्थानीं मानावा असे आहे.