अमोघवज्र ( इंग्लिश: Amoghavajra साचा:Lang-sa ; साचा:CJKV, जन्म ७०५ – निर्वाण ७७४) हे भारतीय बौद्ध भिक्खु होते. तसेच ते बौद्ध भाषांतरकारही होते. अमोघवज्र हे वज्रबोधी यांचे शिष्य होते.. यांनी भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. यांनी अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. यांनी नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करून दिली.

वज्रधातू मंडल अमोघवज्र याचा वापर शिकवण्यादरम्यान करत असत'.

वज्रबोधी हे दक्षिण भारतातील तर अमोघवज्र उत्तर भारतातील होते. म्हणजेच त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादी. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची कीर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.

भाषांतर

संपादन

इ.स. ७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वतःला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी इ.स. ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात हे एकमेव पंडीत होते ज्यांनी एवढे भव्यदिव्य काम केले. ते स्वतः तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत प्रमाणे,

  1. महामयुरीविद्या रागिणी
  2. कुंडीधारिणी
  3. मारिचीधर्म
  4. मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र
  5. गाताअनंतामुख धारिणी.
  6. सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी
  7. महर्षी सूत्र
  8. महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र.
  9. गांगुलीविद्या
  10. रत्नमेघ धारिणी
  11. सालिसंभवसूत्र
  12. राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता
  13. महामेघसूत्र
  14. घनव्युहसूत्र
  15. पर्णसवारी धारिणी.
  16. वैश्रमणदिव्यराजा सूत्र
  17. मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया
  18. पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख
  19. अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी
  20. अष्ट मंडलसूत्र
  21. चक्षूरविशोधन विद्या धारिणी
  22. सर्व रोगप्रसन्न धारिणी
  23. गवलप्रसनन धारिणी
  24. योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी
  25. एकाकुधार्या धारिणी
  26. अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र
  27. नीतिशास्त्र सूत्र
  28. तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी
  29. ओ-लो-तो-लो धारिणी
  30. अश्निशचक्रवर्ती तंत्र
  31. बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र
  32. बोधीमंदव्युहधारिणी
  33. प्रज्ञापारमिताअर्धसटीका
  34. वज्रशेखरयोगा सूत्र
  35. महाप्रतिसार धारिणी
  36. गरुडगर्भराजा तंत्र
  37. वज्र-कुमार-तंत्र
  38. सामंतनिदानसूत्र
  39. महायान-निदानसूत्र
  40. हारितीमात्रिमंत्रकल्प
  41. सर्व धारिणींची एक सुत्री

एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग. यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करून घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करून अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.