अमृतानुभव
(अमृतानुभव - अध्याय ४ या पानावरून पुनर्निर्देशित)
अमृतानुभव अथवा अनुभवामृत[१] (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्विलासानंद असेही नाव आहे.
ग्रंथाचे नाव
संपादनसदर ग्रंथ अमृतानुभव ह्या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव अनुभवामृत असावे असे मत वा. दा. गोखले ह्यांनी संपादित केलेल्या श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडण्यात आलेले आहे.[१] ह्यासाठी त्यांनी पुढील आधार दिले आहेत.
- सदर ग्रंथाच्या उपसंहारात अनुभवामृत असा शब्द वापरलेला आहे. उदा. ज्ञानदेवो म्हणे श्रीमंतु । तें हें अनुभवामृतु । सेवौनि जीवन्मुक्तु । हेंचि होती ।। ७८९ ।।
- हस्तलिखित प्रतींपैकी बहुसंख्य प्रतींत अनुभवामृत हे नाव आलेले आहे.
मात्र अमृतानुभव हे नावही नामदेवांच्या काळापासून प्रचलित असलेले दिसते ही वस्तुस्थितीही उपरोक्त प्रस्तावनेत नोंदवण्यात आली आहे. [२]
अमृतानुभव या ग्रंथाला अनुसरून लिहिली गेलेली पुस्तके
संपादन- अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी (लेखक - डॉ. सुधाकर नायगावकर)
- Amritanubhav in Marathi (Downloadable APK File)-- Sahitya Chintan.
- अमृतानुभव कौमुदी (लेखक - बाबाजीमहाराज पंडित, अमरावती)
- अमृतानुभव : मराठी अनुवाद (लेखक - विजय बळवंत पांढरे). ई-साहित्य.
- सार्थ अमृतानुभव चांगदेव-पासष्टीसह (लेखक - दिवाकर अनंत घैसास)
- सार्थ श्री अमृतानुभव (लेखक - विष्णुबुवा जोग, १९०५)
- सुलभ सार्थ अमृतानुभव (लेखक - दिवाकर अनंत घैसास)
- ज्ञानदेवकृत अमृतानुभव (लेखक अण्णा मोरेश्वर कुंटे, १८८८)
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- साखरे, विनायकबोवा (१९०७). श्रीज्ञानेश्वरविरचित अमृतानुभव : सार्थ व सटीक (दुसरी ed.). त्र्यंबक हरि आवटे, इंदिरा छापखाना, पुणे.
- कुंटे, अण्णा मोरेश्वर (संपा.) (१८८८). श्री ज्ञानदेवकृत अमृतानुभव व त्यावरील श्रीशिवल्याणकृत अमृतानुभवविवरण नित्यानंदैक्यदीपिका. External link in
|title=
(सहाय्य)
- गोखले, वा. दा. (संपा.) (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या पुस्तकाची प्रस्तावना. pp. (१) ते (६८).
- श्रीज्ञानदेव (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- जोशी, बाळकृष्ण भाऊ, श्री ज्ञानेश्वर यांचा अमृतानुभव : साकीबद्ध आणि मराठी सरळ अर्थासह, (१९२४), २री आ., ए. सी. भट, पुणे.