अमीशा पटेल

(अमिशा पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

अमिशा पटेल ( ९ जून १९७६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरामधील टफ्ट्स विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या अमिशाने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गदर: एक प्रेम कथा, आप मुझे अच्छे लगने लगे इत्यादी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.

अमिशा पटेल
जन्म ९ जून, १९७६ (1976-06-09) (वय: ४८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माती
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
नातेवाईक अश्मित पटेल

बाह्य दुवे

संपादन