अमिता मलिक (जन्म : इ.स. १९२१ - - २००९) यांचा भारतीय पत्रकारितेतील प्रथम महिला म्हणून उल्लेख केला जातो. त्या ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट समीक्षक आणि दूरचित्रवाणी माध्यमाच्या समीक्षक होत्या.[१]

१९४४ मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या लखनौ केंद्रावर आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि १९४६ मध्ये त्या दिल्ली केंद्रावर आल्या. त्या देशाच्या प्रसारण व पत्रकारिता क्षेत्राच्या केंद्रस्थानी राहिल्या. ‘स्टेट्समन’, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि ‘पायोनियर’ मधून त्यांनी सदर लेखन केले. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ८० च्या दशकात दूरचित्रवाणीवरील त्यांचे ‘साइट अँड साऊंड’ हे सदर प्रसिद्ध होत असे.[२]

ऑल इंडिया रेडिओच्या विकासातल्या विविध टप्प्यांच्या आणि पुढे १९५९ नंतर दूरचित्रवाणीच्याही विकासाच्या त्या साक्षीदार, इतिहासकार होत्या. १९६५ पासून खऱ्या अर्थाने नियमितपणे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले तेव्हा ६७मध्ये अमिता मलिक यांनी दूरचित्रवाणीवर मार्लन ब्रॅन्डो आणि सत्यजित रे यांच्याबरोबर कार्यक्रम सादर केले होते.[३]

आत्मचरित्र संपादन

  • ‘अमिता, नो होल्ड्स बार्ड : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’

संदर्भ संपादन

  1. ^ "टाईम मॅगेझिन, २५ सप्टेंबर १९९५". Archived from the original on 2000-08-17. 2011-05-06 रोजी पाहिले.
  2. ^ "अमिता मलिक, आरआईपी". Archived from the original on 2011-10-06. 2011-05-06 रोजी पाहिले.
  3. ^ मराठी वाङ्‍मय मंडळ[permanent dead link]

बाह्य दुवे संपादन

साचा:Persondata