अपवर्तन किंवा प्रणमन (इंग्लिश : Refraction) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेत तरंगाच्या गतीतील बदलामुळे तरंगाची दिशा बदलते. सहसा असे वर्तन तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरत असताना घडते, कारण दोन भिन्न गुणधर्मांच्या माध्यमांमधून जाताना तरंगाची गतीही भिन्न असते. अपवर्तनाचे शास्त्रीय विवरण स्नेल यांच्या नियमानुसार केले जाते; ज्यानुसार θ1 हा आयात कोन θ2 या अपवर्तन कोनाशी या सूत्राने बद्ध असतो :

स्नेल यांचा नियम : भिन्न अपवर्तनांक असलेल्या दोन माध्यमांच्या सीमापृष्ठाशी घडलेले अपवर्तन, ज्यात n2 > n1. दुसऱ्या माध्यमात स्थितिवेग (Phase velocity) कमी असल्याने (v2 < v1), θ2 हा अपवर्तन कोन θ1 आयात कोनापेक्षा लहान असतो; त्यामुळे अधिक अपवर्तनांकाच्या माध्यमातील किरण लंबाच्या अधिक जवळ असतो.

यात v1v2 हे संबंधित माध्यमांतील तरंगाचे वेग आहेत आणि n1n2 हे अपवर्तनांक आहेत.

तरंगांच्या अपवर्तनाचे ॲनिमेशन
प्रकाशाचे प्रतल तरंग १ एवढा अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमातून १.५ अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमात जाताना ५६ अंशांच्या कोनातून कसे अपवर्तित होतात याचे चेतनाचित्रण