अनुसुइया उईके

भारतीय राजकारणी

अनुसुइया उईके (जन्म १० एप्रिल १९५७) एक राजकारणी आहेत आणि सध्या छत्तीसगढच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून १९८५ च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दमुआ येथून मध्य प्रदेश विधानसभेवर त्या निवडून आल्या होत्या. अर्जुन सिंह मंत्रिमंडळात त्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या. २००६ मध्ये त्या मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या सदस्य होत्या.[][][][]

अनुसुइया उईके

विद्यमान
पदग्रहण
२९ जुलै २०१९
मुख्यमंत्री भूपेश बघेल
मागील आनंदीबेन पटेल

मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य
कार्यकाळ
१९८५ – १९९०

जन्म १० एप्रिल, १९५७ (1957-04-10) (वय: ६७)
छिंदवाडा, मध्य प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
शिक्षण M.A. (अर्थशास्त्र), LL.B.

१६ जुलै २०१९ रोजी ह्यांची छत्तीसगड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Senior tribal BJP leader Anusuiya Uikey appointed as Chhattisgarh Governor". India Today (इंग्रजी भाषेत). 11 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Anusuiya Uikey Is The New Governor Of Chattisgarh". Shethepeople. (इंग्रजी भाषेत). 11 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Anusuiya Uikey appointed new governor of Chhattisgarh". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 11 May 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Profile on Rajya Sabha". Rajya Sabha (इंग्रजी भाषेत). 11 May 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Anysuya Uikey is new Chhattisgarh governor, Harishchandran to take charge of Andhra Pradesh". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-07-16. 2019-07-16 रोजी पाहिले.