अनुजा साठे (८ ऑक्टोबर, इ.स. १९८७ - ) या एक मराठी अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी सुहास तांबे यांनी लिहिलेल्या ‘उत्तर रात्र’पासून आणि शफाअतखान यांच्या ‘शोभायात्रा’ या मराठी नाटकांपासून केली.

सौरभ गोखले यांचे पती आहेत. दोघेही मांडला दोन घडीचा डाव या दूरचित्रवाणीच्या मालिकेत काम करत होते. त्यांचे लग्न २०१३ साली झाले.

कारकीर्द

संपादन
  • अग्निहोत्र (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • असा मी अशी ती (मराठी चित्रपट)
  • उत्तररात्र (मराठी नाटक)
  • कॉफी आणि बरंच काही (मराठी चित्रपट)
  • घंटा (मराठी चित्रपट)
  • तमन्‍ना (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
  • बाजीराव मस्तानी (हिंदी मालिका)
  • भो भो (मराठी चित्रपट)
  • मांडला दोन घडीचा डाव (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • राखणदार (मराठी चित्रपट)
  • लगोरी-मैत्री रिटर्न्स (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • विसावा - एक घर मनासारखं (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • शोभायात्रा (मराठी नाटक)

पुरस्कार

संपादन
  • कुदळे फाउंडेशनचा नर्गिस दत्त पुरस्कार (९-५-२०१६)