अद्वैत दादरकर
मराठी दूरचित्रवाणी अभिनेता
अद्वैत दादरकर हा एक भारतीय मराठी दूरचित्रवाणी अभिनेता आणि लेखक आहे.[१] तो 'अग्गंबाई सूनबाई', 'माझे पती सौभाग्यवती' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या दूरचित्रवाणी मालिकेसाठी परिचित आहे.[२][३]
अभिनय कारकीर्द
संपादनअद्वैतने दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि २००८ साली जावई माझा भला या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २०११मध्ये शुभम् करोती या मालिकेत त्याने शशांकची भूमिका केली होती. २०१२मध्ये त्यांनी 'राधा ही बावरी' सीरियलमध्ये व्हिक्टर डिकोस्टाची भूमिका साकारली होती. २०१६मध्ये त्यांनी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत सौमित्रची मुख्य भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.
फिल्मोग्राफी
संपादनमालिका | वर्ष |
---|---|
माझ्या नवऱ्याची बायको | २०१८-२०२१ |
अग्गंबाई सूनबाई | २०२१ |
राधा ही बावरी | २०१२-२०१४ |
शुभं करोति | २०१० |
माझे पती सौभाग्यवती | २०१५-२०१६ |
चित्रपट:
मु.पो. बोंबिलवाडी (२०२५) [४]
संदर्भ
संपादन- ^ "भूमिकेची ताकद- 'फक्त तीन महिन्यांसाठी असणार पात्र दोन वर्ष झाली असून साकारतोय'". Maharashtra Times. 2021-03-30 रोजी पाहिले.
- ^ "Adwait Dadarkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2021-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-30 रोजी पाहिले.
- ^ "Adwait Dadarkar to play Soham in Aggabai Sunbai - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-30 रोजी पाहिले.
- ^ "Mukkam Post BombilVadi Movie (2025): Cast, Trailer, OTT, Songs, Release Date | मु.पो. बोंबिलवाडी | Bombilwadi | Exclusive 2024". रंग मराठी. 7 नोव्हेंबर 2024 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनअद्वैत दादरकर आयएमडीबीवर