अदिसयम वॉटर पार्क(रोमन लिपी: Athisayam तमिळ: அதிசயம்) हे मदुरै ह्या शहरापासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या पार्वै ह्या गावात वसलेले एक मनोरंजनाचे ठिकाण/ऍम्युझमेंट पार्क आहे.हे ठिकाण मदुरै-दिंडुक्कल ह्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर असल्याने एक मोठे पर्यटन केंद्र म्हणुन विकसीत होत आहे.एकूण ४० एकराच्या प्रशस्त जागेत वसलेल्या ह्या उद्यानात अनेक प्रकारचे खेळ आणि इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.ह्यात एकूण ४० खेळ व २० पाण्यातील सफरींचा समावेश आहे.अदिसयम वॉटर पार्क हे त्याच्या पाण्यातील राईड्स साठी प्रसिद्ध आहे,त्यात अनेक कृत्रिम धबधबे,तलाव आणि कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

अदिसयम वॉटर पार्क

संपादन
 
अदिसयम वॉटर थीम पार्क

बाह्य दुवे

संपादन