अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज महाअधिवेशन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लाडशाखीय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्वागताध्यक्ष आर. एल. वाणी आदी उपस्थित होते. लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.[१][permanent dead link]
वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्स
संपादनलाडशाखीय वाणी समाजातील अनेक युवकांना रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळावी, नवीन उद्योजकांना स्टार्ट अप करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन मिळावे. या उद्देशाने या महाअधिवेशनात लाडशाखीय वाणी चेंबर्स ऑफ कॉंमर्सची स्थापना केली. या कार्यक्रमात अनावर झालेल्या वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचा दर्जा जागतिक पातळीवरचा होईल, अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या. याचबरोबर वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने २५ ते ३० गावातील तीनशे विध्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याची माहिती शैलेश वाणी यांनी दिली. महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलास वाणी, खजिनदार श्यामकांत शेंडे, सहकार्याध्यक्ष अनिल चितोडकर, संयोजन समितीचे सदस्य श्यामकांत कोतकर, निलेश पुरकर, सचिव राजेंद्र कोठावदे या वेळी उपस्थित होते. डॉ. बी.टी. बधान, डॉ. जगदीश चिंचोरे, प्रा. उषा बागड, सचिन बागड यांनी या ठरावाचे वाचन केले आणि समाजातील उपस्थित नागरिकांनी त्याला अनुमोदन दिले.
समाजमंथन
संपादनसमाजाची माहिती देणाऱ्या "समाजमंथन" या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. देशातील व्यापार उद्योगाच्या वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. हा समाज देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील, विद्यार्थ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या वसतिगृहासाठी सरकारतर्फे लवकरच पुणे आणि नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिले. फडणवीस म्हणाले, लाडशाखीय वाणी समाज हा संघर्षातून पुढे आलेला समाज आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले असून, शिक्षणातही अग्रणी आहे.
संमत ठराव
संपादन- निधन झालेल्या व्यक्तीला मुलीनाही पाणी देता येणार.
- विवाहात हुंडा देऊ अथवा घेऊ नये.
- व्यक्तीच्या मृत्युनंतर अस्थींचे नदीमध्ये विसर्जन न करता जमिनीत पुरून त्याजागी वृक्षांची जोपासना करावी.
- समाजात होणाऱ्या धार्मिक कार्यामध्ये भेटवस्तू देऊ अथवा घेऊ नये.
- घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यासाठी समुपदेशन करणारी यंत्रणा उभारणार.
चित्रदालन
संपादन-
Devendra Phadnavis
-
समाजमंथन पुस्तकाचे प्रकाशन
-
मान्यवर
-
निधी धनादेश
-
जनसंप्रदाय
बाह्य दुवे
संपादनhttp://www.census2011.co.in/data/town/802734-wani.html
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/ladakhacharya-vaani-samaj-maha-vidhyavanaya-in-pune/articleshow/65890833.cms[permanent dead link]