अकासाका पॅलेस (赤坂離宮 Akasaka rikyu?) , किंवा स्टेट गेस्ट हाऊस (迎賓館 Geihinkan?) हे जपान सरकारच्या दोन राज्य अतिथीगृहांपैकी एक आहे. दुसरे राज्य अतिथीगृह क्योतो स्टेट गेस्ट हाऊस हे इतर आहे.

अकासाका पॅलेस
(राज्याचे अतिथीगृह)
local_name
{{lang-साचा:ConvertAbbrev|赤坂離宮(迎賓館)}}
अकासाका पॅलेस
स्थान मोटो आकासाका, मिनाटो, तोक्यो, जपान
क्षेत्रफळ १५,००० मी (१,६०,००० चौ. फूट) (मजल्याची जागा)
१,१७,००० मी (१२,६०,००० चौ. फूट) (साइट)
निर्मिती १८९९ - १९०९
निर्माण कारण युवराज
डाईजो टेन्नो
Invalid designation
सूचीकरण २००९

हा पॅलेस (राजवाडा) १९०९ मध्ये राजपुत्रासाठी भव्य राजवाडा (東宮御所?) म्हणून बांधला गेला होता. आज या राजवाड्याला राज्यातील मान्यवरांच्या भेटीसाठी अधिकृत निवास म्हणून जपान सरकारने नियुक्त केलेले आहे. हा राजवाडा मोटो-अकासाका, मिनाटो, तोक्यो येथे स्थित आहे. या राजवाड्याचे सध्याचे काम १९७४ मध्ये पूर्ण झाले होते. पूर्वी हा वाडा शाही कुटुंबासाठी इतरांपासून अलिप्त असा राजवाडा होता. २००९ मध्ये या राजवाड्याला जपानच्या राष्ट्रीय संपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.[]

आढावा

संपादन
 
मुख्य इमारत आणि मुख्य बाग
 
मुख्य इमारत आणि कारंजे

स्थानः तोक्यो मिनाटो-कु, मोटो-आकसाका-कोमो क्रमांक १

या इमारतीत १५,००० चौरस मीटर (१,६०,००० चौ. फूट) जागा आहे आणि जपानी शैलीतील या संपूर्ण संरचनेने १,१७,००० चौरस मीटर (१२,६०,००० चौ. फूट) जागा व्यापलेली आहे.

मुख्य इमारत एक निओ-बारोक शैलीची पाश्चात्य इमारत आहे,[] ही शैली हॉफबर्ग पॅलेससारखी आहे. हे मेईजी काळात बांधल्या गेलेल्या सर्वात मोठ्या इमारतींपैकी ही एक आहे.[]

राजवाड्याच्या सभोवताल अखंड पदपथाने वेढलेला आहे. हा पदपथ अंदाजे ३.२५ किलोमीटर (२.०२ मैल) लांबीचा आहे.

या पॅलेसच्या जवळचे रेल्वे स्थानक योत्सुया स्टेशन आहे .

इतिहास

संपादन

आकासाका पॅलेस असलेला प्रदेश टोकुगावा कालावधीत कीश डोमेनच्या शासक टोकुगावा कुळातील प्रमुख शाखा असलेल्या निवासस्थानाचा भाग होता.[] मेईजीच्या जीर्णोद्धारनंतर ओवरीने ही जमीन इम्पीरियल हाऊसिंगला दान केली होती.

हा राजवाडा काटायामा तोकुमा (片山 東熊?) नावाच्या शिल्पकाराद्वारे डिझाइन केलेला आहे. तो योशिया कॉन्डर यांचा विद्यार्थी होता. निओ-बारोक रचना १८९९ आणि १९०९ च्या दरम्यान त्या वेळेसच्या युवराजांसाठी निवास म्हणून बांधण्यात आली होती. आधी त्याचे नाव टोगु पॅलेस असे ठेवले होते. याचा जपानी भाषेतील अर्थ "राजपुत्रासाठी पॅलेस असा होतो. परंतु जेव्हा राजपुत्राने त्यांचे निवासस्थान हलविले तेव्हाचे त्याचे नाव बदलून आकासाका पॅलेस केले गेले.[]

ते रीजेन्ट क्राउन प्रिन्स हिरोहितो त्याच्या राज्याभिषेकाच्या दोन महिन्यांपूर्वी पासून, सप्टेंबर १९२३ [] ते सप्टेंबर १९२८ पर्यंत अकासाका पॅलेसमध्ये वास्तव्य करीत होते. ही व्यवस्था तात्पुरती होती परंतु ती पाच वर्षे चालली. त्यांच्या समकालीन निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या वेळी, हिरोहितोने २८ ऑगस्ट १९२३ रोजी अकासाका पॅलेस येथे तात्पुरता निवास करण्याचा विचार केला. चार दिवसांनंतर, १ सप्टेंबर रोजी जपानला ग्रेट कांटो भूकंपचा धक्का बसला. अकासाका पॅलेसमधील निवासस्थानाच्या वेळी, क्राउन प्रिन्स हिरोहितोने लग्न केले आणि त्यांना राजकन्या सचिको (वयाच्या ६ व्या महिन्यातच वर्षी निधन झाले) आणि राजकुमारी शिगेको या दोन मुली झाल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपान सरकारने आकासाका पॅलेस शाही घराण्याकडून काढून घेतले. राजवाड्यात कित्येक शासकीय कार्यालये स्थापित केली गेली, ज्यात १९४८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय डाएट लायब्ररी,[] कॅबिनेट लेजिलेशन ब्युरो आणि तोक्यो ऑलिम्पिक १९६४ समिती यांचा समावेश आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b 国宝・重要文化財(建造物)の指定について (PDF) (जपानी भाषेत). Tokyo: Agency for Cultural Affairs. October 16, 2009. October 8, 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  2. ^ a b c Cabinet Office, Government of Japan (2008). 迎賓館 [Reception hall] (जपानी भाषेत). March 10, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 4, 2010 रोजी पाहिले.
  3. ^ 昭和聖徳記念財団 (Showa Memorial Foundation). 6月公開「山本内閣親任式の図」 (Japanese भाषेत). March 4, 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ 国立国会図書館 (National Diet Library). 沿革 [History] (Japanese भाषेत). September 26, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 4, 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन