अंधश्रद्धा

अंधापणाने टाकलेला विश्वास किंवा श्रद्धा
(अंधश्रद्धा निर्मूलन या पानावरून पुनर्निर्देशित)

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

व्हॅटिकनमध्ये 'एक्सॉरसिजम' नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो.[] इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.[] अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ ...जेव्हा व्हॅटिकनमध्ये भरते भूत उतरवण्याची शाळा. BBC News मराठी. 25-04-2018 रोजी पाहिले. 'भूतबाधा झाली तर मांत्रिकाकडे पाठवा'या कोर्सला जगभरातून मागणी आहे. कारण अनेक देशांमध्ये भूतबाधेच्या केसेस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मांत्रिकांना मागणी वाढत आहे, असं ख्रिश्चन धर्मगुरूंचं म्हणणं आहे. जर एखाद्या व्यक्तीला खरंच आधिदैविक त्रास किंवा भूतबाधा झाली आहे असं वाटत असेल तर त्याला मांत्रिकाकडे पाठवा, असं आवाहन गेल्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरूंना केलं होतं. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ शासनाने प्रसिद्ध केलेला संपूर्ण अधिनियम[permanent dead link]