अंतःस्रावी ग्रंथी(एंडोक्रायीन) बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा (हार्मोन) स्राव करतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो व त्याचे कार्य पार पडते. तसेच या ग्रंथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंतःस्रावी तंत्र शरीराच्या चयापचय, विकास, तारुण्य, ऊती क्रिया, व चित्त (मूड) या नियंत्रीत करत असतात. प्रत्येक स्त्रावाचे वेगवेगळे कार्य असते. स्त्राव तयार करणे व ते रक्तात प्रमाणात मिसळणे, यांचे नियंत्रण अंतःस्रावी ग्रंथी करतात.

प्रमुख अंतःस्रावी ग्रंथि : . (पुरुष उजवी बाजू, महिला डावी बाजू.) १. गावदुम ग्रंथि २. पीयूष ग्रंथि ३. अवटु ग्रंथि ४. बाल्यग्रंथि थायमस ५. आधिवृक्क ग्रंथि ६. स्वादुपिंड ७. बीजांडकोष ८. वृषण

शरीरात खालील प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात.