अंजली भागवत

भारतीय नेमबाज
(अंजली रमाकांत वेदपाठक या पानावरून पुनर्निर्देशित)


अंजली भागवत (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - ) ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ओलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास निरमिला.

अंजली भागवत
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव अंजली रमाकांत वेदपाठक
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ५ डिसेंबर, इ.स. १९६९
जन्मस्थान मुंबई
उंची ५ फूट ४ इंच (१६३ सेमी)
खेळ
देश भारत
खेळ रायफल शूटिंग

अंजली भागवत हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ नवे विक्रम प्रस्थापित केले, आणि ५५ सुवर्ण, ३५ रौप्य व १६ कांस्य पदके जिंकली. भारतातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर ८ नवे विक्रम नोंदले गेले.

पुरस्कार

संपादन

राजीव गांधी खेळ-रत्न (२००३) अर्जुन पुरस्कार (२०००)

  • १९९२: श्री शिव छत्रपती अवार्ड
  • १९९३: महाराष्ट्र गौरव पुरस्कार
  • १९९३: वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार
  • २००२: इंडो-अमेरिकन सोसायटीतर्फे यंग अचीव्हर पुरस्कार
  • २००३: टाईम्स गट महाराष्ट्र शान
  • २००३: हिरो इंडियन स्पोर्ट्‌स अवॉर्ड - सर्वोत्कृष्ट खेळाडू
  • २००३: हिसा स्पोर्ट्स वुमन ऑफ दी इयर
  • २००३: वर्षाचील हिसा शूटर
  • २००४: वर्षाचा हिसा शूटर
  • २००५: जीआर ८ महिला पुरस्कार प्राप्त पुरस्कार
  • २००५: शिक्षकांचा पुरस्कार
  • २००६: एफआयई फाऊंडेशन नॅशनल पुरस्कार