अंगिरस

(अंगिरस्‌ या पानावरून पुनर्निर्देशित)


अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.